आमदार राजू पाटील नवघरे यांनी बस चालवून केले उद्घाटन
वसमत (Vasmat Aagar Bus) : वसमत येथील आगारात बस गाड्या जुन्या व खटारा झाल्या होत्या प्रवाशांच्या तक्रारी व गैरसोई वाढल्याने आमदार राजू पाटील नवघरे यांनी थेट परिवहन मंत्र्यांशी संपर्क साधून नव्या गाड्यांची मागणी केली होती ती तात्काळ पूर्ण झाली आहे वसमत साठी दहा बस गाड्या मंजूर झाल्या असून पाच गाड्या वसमत आगारात सोमवारी दाखल झाल्या नव्या आलेल्या (Vasmat Aagar Bus) बसचे पूजन व उद्घाटन आमदार राजू पाटील नवघरे यांनी केले त्यावेळी त्यांनी चक्क बस चालवली आमदार बस चालत असल्याचे पाहण्यासाठी प्रवासी व चालक वाहकांनी गर्दी केली होती.
वसमत आगारात प्रवासी संख्या भरपूर आहे मात्र बस संख्या कमी आहे असलेल्या बसही जुनाट व खटारा झालेल्या आहेत ग्रामीण भागात तर बस कधी बंद पडेल याचा नेम नसतो लांब पल्याच्या (Vasmat Aagar Bus) गाड्याही मध्येच बंद पडण्याच्या तक्रारी असतात. खटार्या गाड्यांमुळे प्रवाशांचे हाल तर व्हायचेच तसेच चालक वाहलकांनाही नाहक त्रास सहन करावा लागायचा या पार्श्वभूमीवर आमदार राजू पाटील नवघरे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला होता वसमत साठी नव्या गाड्यांची मागणी केली होती.
परिवहन मंत्र्यांनी तात्काळ मागणी मंजूर केली असून वसमत आगारासाठी दहा बस सकाळी मंजूर झाले आहेत. त्यातील पाच गाड्या सोमवारी वसमत बस स्थानकात दाखल झाले आहेत त्या बस गाड्यांचे उद्घाटन आमदार राजू पाटील नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभापती तानाजी पाटील बेंडे राजू भैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालूमामा ढोरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आघार प्रमुख चालक वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवाशांना दर्जेदार सेवा मिळाव्यात चालक वाहक (Vasmat Aagar Bus) व कर्मचाऱ्यांनाही त्रास होऊ नये या दृष्टीने आपण पाठपुरावा केला असल्याचे आमदार राजू पाटील नवघरे यांनी सांगितले.
आमदाराने चालवली चक्क बस
नव्या बस गाड्या (Vasmat Aagar Bus) वसमत आगारात दाखल झाल्यानंतर त्याचे रीतसर पूजन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार नवघरे यांनी चक्क बस चालवून सर्वांनाच चकित केले आमदार बस चालवत आहेत ते पाहण्यासाठी प्रवासी चालक वाहक यांनी गर्दी केली होती. आमदार बसच्या स्टेरिंग वर बसलेले व बस चालवत असल्याचे दुर्मिळ चित्र वसमतकरांना पहावयास मिळाले.