देश-विदेशांतून पाचशेहून अधिक स्पर्धकांचा सहभाग
बुलडाणा () : कोल्हापूर स्पोर्टस क्लब आणि रग्गेडियनच्या वतीने ट्रायथलॉन, ड्युएथलॉन स्पर्धा नुकताच राजाराम तलाव येथे झाली. या स्पर्धेत दोन वेळा दक्षिण अफ्रिकेत ९० किमी मॅरेथॉन यशस्वी करणारे बुलडाण्याचे वेगवान धावपटू साहसवीर नितीन चौधरी (Nitin Chaudhary) यांनी लोहपुरुष ट्रायथलॉन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.
त्यांनी २ किलोमीटर पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर रनिंग अशा तीन प्रकारांत त्यांनी हे यश मिळवले. त्यांनी दोन किमी तास पोहणे (१:२२:५१), ९० किमी सायकलींग (३:५३:३४), रनिंग (२:४८:२२) असे त्यांनी हाफ आयर्नमॅन स्पर्धा ८ तास २४ मिनीटात पूर्ण केली. या स्पर्धेत देश-विदेशातूून पाचशेवर स्पर्धक सहभागी झाले. यात नितीन चौधरी (Nitin Chaudhary) याचे सर्वसाधारण गटात ६१ तर वयोगटात १६ क्रमांकावर राहिले. ट्रायथलॉनमध्ये स्विमिंग, सायकलिंग, रनिंग अंतर पार करण्यास कस लागतो. नितीन चौधरी यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.