चिखली (Buldhana) :- केंद्र आणि राज्य शासनाच्या (State Govt) माध्यमातून गरजू लोकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत.याच पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानातून गरजवंत लोकांना स्वस्तात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र आता सरकाने राशन मधून गव्हाचे वाटप बंद केल्यामुळे गोरगरीबांना गव्हाच्या ऐवजी ज्वारीची भाकरी खावी लागणार असल्याने सरकार पुन्हा गोरगरिबावर पूर्वीचे दिवस लादत असल्याचे चित्र दिसून येत आहे.