“स्वबळावर झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाही!”
कळमनुरी (Municipal Council Elections) : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी येथील शासकीय विश्रामगृहात दि.१२ ऑक्टोंबर रोजी भारतीय जनता पार्टीची (Bharatiya Janata Party) कार्यकर्ता बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या तयारीसंदर्भात रणनिती, संघटनात्मक बळकटी आणि स्वबळावर लढण्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांना देण्यात आला.
बैठकीस हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार व जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष रामराव वडकुते, शशिकांत वडकुते, उमेशजी नागरे, मराठवाडा उद्योग आघाडीचे श्री. संजय कावडे, डॉ. प्रकाश नाईक, दिनकर कोकरे, ग्रामीण मंडळ अध्यक्ष विठ्ठल भोयर, मनोज देशमुख, सतीश कुलकर्णी, नंदू सोनटक्के, रवी सुर्यवंशी, तसेच कळमनुरी मंडळ अध्यक्ष ओमकार नावडे आणि शहरातील असंख्य जेष्ठ नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेचा विश्वास!
बैठकीदरम्यान, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार गजाननराव घुगे यांनी “युती होऊ दे वा न होऊ दे, कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढायला सज्ज व्हा” असे स्पष्ट मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी सर्व भावी नगरसेवक व नगराध्यक्षपदाचे दावेदार यांच्याशी संवाद साधत म्हटलं की, “भाजप कार्यकर्ते कुठेही कमी पडणार नाहीत; आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. यानंतर आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी आत्मविश्वासाने सांगितले,“तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि तयारीला लागा. आम्ही मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा करून कळमनुरी शहरासाठी अधिकाधिक सहाय्य आणू. कार्यकर्त्यांचा (Activists) उत्साह आणि जनतेचा विश्वास या जोरावर कळमनुरी नगरपरिषदेत भाजपाचा भगवा झेंडा नक्की फडकवू!”
कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती!
बैठकीच्या शेवटी सर्व नेतेमंडळींनी एकमताने निर्णय घेतला की “कळमनुरी नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढेल आणि नगरपरिषदेत भगवा झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाही.” या वेळी ओमप्रकाश मेने, भागवत दादा ठाकुर, अशोक संगेकर, उमेश सोमाणी, अमिष दरक, बाळू घुसे, नारायण डुरे, बबन आप्पा पचंलिगे, बाळू वैद्य, विलास भोसकर, नंदकिशोर मणियार, गोविंद मणियार, शंभू कावडे, राजु भैय्या जाधव, विक्रम शिंदे, हारिष भोसले, महिला अध्यक्ष खंदारे मॅडम, संजय पाटील, अनिल इंगळे, योगेश सगेंकर, विकास ठाकुर, पारस माडंवगडे यांच्या सहभाजप कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.