गोंदिया (Gondia Murder Case) : चिचगड पोलिस स्टेशन (Chichgarh Police) अंतर्गत ढासगड जाणार्या रस्त्याच्या झाडीझुडूपात एका २५ ते ३० वर्षीय अनोळखी दिव्यांग गर्भवती महिलेचा मृतदेह २३ जुलै २०२१ ला आढळला होता. या प्रकरणात चिचगड पोलिस ठाण्यात (Chichgarh Police) गुन्हा नोंद करण्यात आला. प्राथमिक तपासदरम्यान त्या महिलेची हत्या (Murder Case) करून मृतदेह विल्हेवाट लावण्याच्या अनुसंगाने फेकण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानुरूप चिचगड पोलिसांनी शोधचक्र फिरवून तीन आरोपींना अटक केली होती. या प्रकरणात तिन्ही आरोपींना दोषी ठरवून न्यायालयाने निर्वाळा देत जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे. समीर अस्लम शेख (२६) रा. लाखनी जि. भंडारा, आसिफ समशेर खॉ पठाण (३८) रा.भंडारा व प्रफुल पांडूरंग शिवणकर रा. दुधा ता. उमरेड जि. नागपूर असे शिक्षा झालेल्या आरोपींचे नाव आहे.
जिल्हा न्यायालयाचा निर्वाळा
माहितीनुसार, चिचगड येथून ढासगडकडे जाणार्या मार्गावरील झाडीझुडपीत एक अनोळखी दिव्यांग गर्भवती महिलेचे मृतदेह आढळले होते. प्राथमिक तपासदरम्यान तिची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे समोर आले. यानुरूप (Chichgarh Police) चिचगड पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास केला. घटनास्थळावरील भौतिक पुरावे, तांत्रिक बाबीच्या आधारावर समीर अस्लम शेख (२६) रा.लाखनी जि. भंडारा, आसिफ समशेर खॉ पठाण (३८) रा.भंडारा व प्रफुल पांडूरंग शिवणकर रा. दुधा ता. उमरेड जि. नागपूर या तिघांना अटक करण्यात आली. या (Murder Case) प्रकरणाचा तपास करीत ७ ऑक्टोबर २०२१ रोजी न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले.
या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सबळ साक्ष पुराव्यावरून न्या.वानखेडे यांनी आरोपींना दोषी ठरविले. या प्रकरणाचा निर्वाळा देत तिन्ही आरोपींना आजन्म कारावास व १० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या (Murder Case) प्रकरणाचा तपास तत्कालीन पोउपनि मनोहर इस्कापे यांनी तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली केले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे न्यायालयीन कामकाज सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता यांनी पाहिले. त्यांना अॅड. प्रणिता कुलकर्णी यांनी विशेष सहकार्य केले. (Chichgarh Police) पोलिसांकडून रिम्पी हुकरे यांनी कामकाज पाहिले.