पोलिसांचा मोठा बंदोबस्त
औंढा नागनाथ (Prof. Laxman Hake) : ओबीसी आरक्षणाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण प्राध्यापक लक्ष्मण हाके (Prof. Laxman Hake) , नवनाथ वाघमारे हे दिनांक १७ सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी ११:३० वाजे दरम्यान मोठ्या बंदोबस्तात कळमनुरी कडे जात असताना औंढा नागनाथ शहरातील श्री नागनाथ मंदिर कमान परिसरात त्यांचे फटाक्याच्या अतिशबाजीत जेसीबी च्या साह्याने फुलाची उधळण करून सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
यानंतर ओबीसी आरक्षणाचे नेते लक्ष्मण हाके (Prof. Laxman Hake), वाघमारे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन घेऊन श्री आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाचे दर्शन घेतले यावेळी श्री नागनाथ संस्थांच्या वतीने त्यांचा नागनाथाची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला यानंतर सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने त्यांचा नागनाथाची प्रतिमा भेट देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी ओबीसी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता