धनज बु. (Washim):- सततची नापिकी आणि कर्जाचा डोंगर तसेच अवाजवी वीज बिल (electricity bill) यातून युवा शेतकर्याने विहिरीत उडी घेवून जीवनयात्रा संपविली. येथून जवळच असलेल्या भामदेवी येथे आज, १२ ऑगस्ट रोजी ही घटना उघडकीस आली असून, निकेश संजय शेटे वय २९ असे आत्महत्या केलेल्या युवा शेतकर्याचे नाव आहे.
मृतदेह आढळला विहरीत
प्राप्त माहितीनुसार संजय उत्तमराव शेटे यांचा मुलगा मृतक निकेश संजय शेटे हा १० ऑगस्ट रोजी शेतात फवारणी (spraying) करण्यासाठी जातो म्हणून घरून फवारणीचे साहित्य घेऊन गेला. परंतु संध्याकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याचा शेतात जाऊन शोध घेतला. मात्र निकेशचा शोध न लागल्याने धनज बु. पोलीस स्टेशनला (Police Station) ११ ऑगस्ट रोजी हरविल्याबाबत रिपोर्ट दिला. मात्र १२ ऑगस्ट रोजी निकेशचा मृतदेह (dead body) भामदेवी येथील शेतकरी देवानंद इंगोले यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला. सततची नापिकी, शेतीचे पीक कर्ज व तसेच महवितरणकडून जुलै महिन्याचे अवाजवी ४०,००० रुपये घरघुती बिल देण्यात आले होते. अवाजवी बिल निकेशकडून भरणे शक्य न झाल्याने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता.