हिंगोली (Hingoli Water supply) : शहर पाणी पुरवठा योजनेतंर्गत सिध्देश्वर धरण येथून पाणी पुरवठा करणार्या मुख्य जलवाहीनीवरील नॉन रिटन वॉल ना दुरूस्ती झाल्यामुळे पाण्याच्या गळतीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे (Hingoli Water supply) दुरूस्ती करीता सुरूवात झाली असुन १५ ऑक्टोंबर पर्यंत हिंगोली शहरात पाणी पुरवठा होणार नसल्याने नागरीकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी केले आहे.
हिंगोली शहर पाणी पुरवठा योजनेचे सिध्देश्वर येथील वॉल दुरूस्तीचे कामे १३ ऑक्टोंबर पासुन सुरूवात करण्यात आलेली आहे. सदरील वॉल दुरूस्तीचे काम पुर्ण होईपर्यंत १५ ऑक्टोंबर पर्यंत हिंगोली शहराचा पाणी पुरवठा (Hingoli Water supply) बंद ठेवण्यात येणार आहे. दुरूस्तीचे काम पुर्ण झाल्यानंतर शहरात रोटेशन पध्दतीने पाणी पुरवठा सोडला जाईल, त्यामुळे नागरीकांनी पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करावा व नगर पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन नगर परिषदेतर्फे करण्यात आले आहे.