शासनाकडून मिळणार प्रोत्साहनपर रक्कम
गडचिरोली (Naxalite Surrender Case) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष जहाल नक्षली भूपती व अन्य ६० नक्षल्यांनी गडचिरोली येथे आत्मसमर्पण केले होते. यामध्ये तब्बल १२ नक्षली जोडप्यांनी शस्ते खाली ठेऊन नवजीवनाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यांना आत्मसमर्पण योजनेअंतर्गत रक्कम दिली जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
आत्मसमर्पण करणार्या (Naxalite Surrender Case) नक्षली जोडप्यामध्ये विवेक ऊर्फ भास्कर सुरेंदर ऊर्फ रघु ईररी व त्याची पत्नी स्वाती सायलु सलाकुला ऊर्फ सरोजा, रविकुमार ऊर्फ मल्लेश ऊर्फ कुमार ऊर्फ रवि मुपलय्या मनुगाला व त्याची पत्नी पदमा ऊर्फ पार्वती होयाम, रामदास ऊर्फ रामजी चन्ना गावडे व त्याची पत्नी सगुणा ऊर्फ ज्योती मडकाम, बिच्चेम ऊर्फ सन्नु आयतू कडीयाम व त्याची पत्नी मंगली सोमा कुंजाम, कमलेश ऊर्फ नंदा जोगा नुप्पो व त्याची पत्नी मंजुला ऊर्फ रामे जोगा कुंजामी, आसमान ऊर्फ रामु हिडमा काराम व त्याची पत्नी अंकीता ऊर्फ मंजू उंगा हलामी, बलदेव ऊर्फ लकमा हुर्रा कुंजाम व त्याची पत्नी ज्योती ऊर्फ अनुषा सन्ना मुचाकी, शबीर ऊर्फ अर्जुन कोवा येमला व त्याची पत्नी मंगलु ऊर्फ लता जोगा वेलो, जीतरु ऊर्फ गंगु जोगा नुप्पो व त्याची पत्नी निला ऊर्फ पोजे गंगा वेट्टी, रोहीत ऊर्फ शिवकुमार सुकलु टेकाम व त्याची पत्नी सायबो ऊर्फ गिता दिवो पोड्याम, निखील ऊर्फ राजेश ऊर्फ आयतु पांडू लेकामी व त्याची पत्नी निर्मला ऊर्फ उमेश्वरी राजु ताडामी आणि दलसू ऊर्फ मैनु ऊर्फ जोगा पुसु गावडे व त्याची पत्नी जुन्नी ऊर्फ नेरो रावजी नरोटी यांचा समावेश आहे.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन गटाने आत्मसमर्पण केल्यास एकत्रित मदत म्हणून एकुण १० लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे. गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने (Naxalite Surrender Case) नक्षल्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन २०२२ ते आतापर्यंत एकूण १३४ जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे.सन २०२५ मध्ये १५ ऑक्टोबर रोजी आत्मसमर्पित झालेल्या ६१ नक्षल्यासह एकूण १०१ जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
गडचिरोली पोलीस दलाच्यावतीने आत्मसमर्पित नक्षल्यांच्या जिवनात आनंद निर्माण करण्यासाठी त्यांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अनेकांना व्यवसायीक प्रशिक्षण देऊन रोजगारही उपलब्ध करून दिला जात आहे. कित्येक आत्मसमर्पित नक्षल्यांना लॉयडस कंपनीत रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.
नक्षल्यांच्या पुनवर्सनासाठी ३ कोटी १ लाख रूपयांची मिळणार रक्कम
१५ ऑक्टोबर रोजी ६१ नक्षल्यांनी आत्मसमर्पण (Naxalite Surrender Case) केल्याने या सर्वांच्या पुनर्वसनासाठी जवळपास ३ कोटी १ लाख ५५ हजार रूपयांची रक्कम शासनाच्यावतीने दिली जाणार आहे. आत्मसर्पित केलेल्या नक्षल्यावर ५ कोटी २४ लाख रूपयांचे बक्षिस शासनाने जाहीर केले होते.