राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही उपस्थिती राहणार
हिंगोली (Sharad Pawar) : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार हे २७ जानेवारीला हिंगोलीत येणार असून श्रीक्षेत्र नर्सी नामदेव येथे संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन हिंगोलीत स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख टाकळगव्हाणकर यांच्या शताब्दी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी दिली.
राकाँचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार हे २७ जानेवारीला नांदेड जिल्ह्यात येणार असून माहुर येथे स्व.प्रदीप नाईक यांच्या कुटुंबियांचे सात्वंन करणार आहेत. त्यानंतर हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथे संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. या ठिकाणाहून हिंगोलीत ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख टाकळगव्हाणकर यांना शंभर वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या शताब्दी सोहळ्याला उपस्थित राहणार असून याचवेळी हॉटेल शांतीचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत. या अनुषंगाने त्यांची नुकतीच राकाँ जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, जि.प.माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे, रविंद्र गडदे, कैलास देशमुख, मुजीब पठाण आदींची उपस्थिती होती.




