मानोरा (Washim) :- माजी मंत्री बच्चु कडू (Bacchu kadu) हे शेतकर्यांना कर्जमाफीसह विविध मागणीसाठी अन्नत्याग आंदोलनाचा मुख्यमंत्र्यांचा ६ दिवस पूर्ण झाले तरी राज्यातील सत्ताधारी महायुती सरकार जागे होत नसल्याने त्यांच्या समर्थनास प्रहार सेवकांनी दि. १३ जून रोजी तहसील कार्यालयाचा ताबा घेऊन सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करून एकदिवसीय आंदोलन केले.
तहसील कार्यालयाचा ताबा घेऊन सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करून एकदिवसीय आंदोलन केले
माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu)हे शेतकर् याना कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी रविवार पासून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुकुंज मोझरी यांच्या पावन भूमीत आंदोलन करीत आहेत मात्र मुख्यमंत्री (chief Minister)देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)व त्यांच्या सरकारमधील कोणत्याही प्रतिनिधीने आंदोलनाला भेट दिली. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मात्र शासन आणि प्रशासन आजवर कोणतेही निर्णय घेऊ शकलेले नाही. त्यामुळे प्रहार पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष पसरलेला आहे. अन्नत्याग आंदोलनाला यश न आल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी प्रहार सेवकांनी दिला. आंदोलनाला ठाणेदार प्रविण शिंदे यांनी ताफ्यासह भेट देवून आंदोलकर्त्याशी चर्चा केली. या एकादशीय आंदोलनात प्रहार सेवक शाम पवार, ॲड रवि राऊत, चेतन पवार, शेतकरी प्रल्हाद पवार यांच्या सह शेतकरी व दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती.