खैरे कुणबी समाज बहुउद्देशीय विकास संस्था चे आयोजन
कळमेश्वर (Women Empowerment) : सिद्धेश्वर हनुमान मंदिर गोरेवाडा जलाशयाच्या निसर्गरम्य परिसरात महिला सक्षमीकरण व युवती मेळावा नुकताच पार पडला. या (Women Empowerment) मेळाव्याला नागपूर शहर तसेच ग्रामीण भागातील महिला भगिनींनी उपस्थिती नोंदवली होती.
खैरे कुणबी समाज बहुउद्देशिय विकास संस्था, झिंगाबाई टाकळी, नागपूर च्या वतीने या (Women Empowerment) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला दिन व होळी मिलन सोहळा सुद्धा महिलांकडून साजरा करण्यात आला. मेळाव्या च्या अध्यक्षस्थानी सौ सुषमाताई रडके होत्या तर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ कु. आयुषी डंभारे , सौ विजयाताई धोटे, सौ छायाताई उरकुडे, सौ रिताताई डंभारे, सौ वंदनाताई नांदे, सौ संगिताताई खेवले, सौ वसुधाताई धोटे, सौ रजनीताई बैलमारे, सौ गिताताई मुळे, सौ वर्षाताई खेवले, सौ अर्चनाताई धनरे, सौ गिताताई डंभारे, सौ वृषालीताई पाल, सौ अंजुताई कुडे, सौ सुनंदाताई भोयर, सौ नितुताई कुडे, कु . प्रेरणा डंभारे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील महिला व युवती वर्ग उपस्थित होता तर प्रमुख अतिथी म्हणून अनुप रडके, प्रभाकर डंभारे, सुरेश खेवले,विजय चापले, गजानन बैलमारे, श्री राजेंद्रजी खेवले, श्री सतिशजी उरकुडे, पंढरी धोटे, प्रभाकर नांदे, जितेंद्र कुडे, भय्याजी मुळे, वैशाख धनरे, सुरेंद्र कुडे, शेखर पाल,संजय भोयर,दिलिप जाधव, शुक्ला, ओझा यांची उपस्थिती होती यावेळी सौ रीता डंभारे यांनी कवितेमधून महिलांबद्दल आपले विचार व्यक्त केले.
आग लागल्यास त्याची खबरदारी कशी घ्यावी आणि ती कशी वीझवावी याबाबत सुरेश खेवले यांनी प्रात्यक्षिकाद्वारे समजून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ रजनी बैलमारे यांनी केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात सौ सुषमा रडके यांनी महिलांबद्दल विचार व्यक्त करत प्रगत व विज्ञान प्रिय समाज निर्मितीसाठी महिलांचे मोठे योगदान असल्याचे सांगत धकाधकीच्या जीवनात स्त्रियांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसते म्हणून शैक्षणिक व आर्थिक प्रगती साधताना स्त्रियांनी शारीरिक सुदृढतेवर भर असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले. (Women Empowerment) समितीचे अध्यक्ष प्रभाकर डंभारे यांनी महिलांबद्दल व समाजाबद्दल विचार व्यक्त केले आभार सौ रजनी बैलमारे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खैरे कुणबी समाज बहुउद्देशीय विकास संस्था झिंगाबाई टाकळी च्या वतीने समाज बांधवांनी मेहनत घेतली.