मानोरा (Art of Living) : जिल्ह्यातील युवकांना शारीरिक मानसिक व भावनिक आरोग्य मिळवून देऊन सक्षम बनविणारे युवक नेतृत्व प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक 21 ते 27 जुलै या कालावधीमध्ये ठाकरे पॅलेस मानोरा येथे पार पडणार आहे. तरी 18 ते 40 वयोगटातील युवक व युवतींनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे सचिव तथा (Art of Living) आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक मनोज इंगोले यांनी केले आहे.
आत्मविश्वास वाढवण्यासाठी शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य मिळवण्यासाठी निर्णय क्षमता वाढविण्यासाठी संघटन कौशल्य, नेतृत्व गुण, सकारात्मकता, ऊर्जा मिळविण्यासाठी सदर ट्रेनिंग आयोजित करण्यात आले आहे.
भारतामध्ये गुरुकुल अस्तित्वात होते तेव्हा युवकांचा सर्वांगीण विकास करणारा अभ्यासक्रम होता. शिक्षण पद्धतीतूनच त्यांना आरोग्य, आत्मविश्वास, संघटन कौशल्य, संभाषण कौशल्य मिळत होते. परंतु इंग्रजांनी राज्य केले तेव्हापासून शिक्षण पद्धती बदलवली, आपल्या युवकांना हया मूल्यवान गोष्टी ज्या शेवटच्या श्वासापर्यंत उपयोगी आहेत, हया मिळणे बंद झाल्या आहेत. जे (Art of Living) शिक्षण शाळा कॉलेजमध्ये मिळत नाही किंवा कमी मिळते असे वाटते म्हणून आपण ट्युशन क्लासेस, एक्सट्रा क्लासेस लावतो आणि ते मिळवून घेतो.
परंतु ज्या गोष्टी शेवटच्या श्वासापर्यंत उपयोगी येणाऱ्या शिक्षण पद्धतीतून मिळत होत्या ज्या आता मिळत नाहीत, त्या मिळवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचे ट्रेनिंग घेत नाही. म्हणून परमपूज्य गुरुदेव श्री रविशंकरजी यांनी युवकांना घडविणारे त्यांच्यात जबाबदारीची जाणीव निर्माण करून देणारे, त्यांच्यातील विविध विलक्षण क्षमता जागृत करणारे कर्मयोग ट्रेनिंग बनविले आहे. श्री श्री रविशंकरजी (Sri Sri Ravi Shankar) म्हणतात प्रत्येक व्यक्तीमध्ये असे काही कौशल्य आहे जे त्यालाही माहित नाही.
या ट्रेनिंगमुळे आपल्यातच असलेल्या कलागुणांना
आपल्याला ओळखता येईल आणि त्यात वाढ होईल. सर्व कम्फर्ट झोन तुटून “माझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही” असा प्रचंड आत्मविश्वास निर्माण होईल. 18 ते 40 वयोगटातील प्रत्येक युवक- युवतींनी हे (Art of Living) ट्रेनिंग केले पाहिजे. हे सात दिवसाचे निवासी ट्रेनिंग आहे. जीवनातले सात दिवस देऊन अमुलाग्र बदल जीवनभरासाठी स्वतःमध्ये घडवता येणे शक्य आहे. म्हणून सदर मिळालेल्या संधीचा लाभ घेण्याकरिता 20 जुलै ला सायंकाळी पाच वाजता ठाकरे पॅलेस येथे सुरू होत असलेल्या ट्रेनिंग मध्ये भाग घ्यावा, जागा मर्यादित असल्याने पूर्व नाव नोंदणी आवश्यक असल्याने मनोज इंगोले व जितेंद्र चव्हाण यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




