संगम चिंचोली गावाचा संपर्क तुटला
उमरखेड (Panganga River flood) : तालुक्यात पळशी गावाला पैनगंगा नदीच्या पुराचे पाणी गावात शिरल्याने गावकर्यांची ताराबंळ उडाली. ईसापूर धरणाचे १३ गेटचे पाणी (Panganga River flood) पैनगंगा नदीच्या पात्रात सोडल्याने नदी काठावरील गावकर्यांना भितीचे वातावरण झाले. १८ ऑगस्ट रोजी पळशी गावाला पूराचा वेढा झाल्याने गावकरी चिंतेत पुराचे पाणी गावात आले.
हनुमान मंदीराच्या परिसरात शाळा, दवाखाना,पोस्ट ऑफीस गावाजवळचा पूलाजवळ पूरांचे पाण्याची धार आल्याने गावातील महिला- पुरुष तरुण मंडळी बालके यांची तारांबळ उडाली. पाच दिवसा पासून सतत मुसळधार पाऊस सुरु आहे. १५ व १६ ऑगस्ट रोजी ढगफुटी अतिवृष्टी वाढल्याने पैनगंगा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढल्याने दोन्ही थड्याच्या पाण्याने वाहत होती. ईसापूर धरणाचे गेट उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने सर्वत्र ठिकाणी पूराचा प्रकोप दिसून येत आहे. त्यातून (Panganga River flood) पैनगंगा नदी काठावरील शेतकर्यांच्या पिके उद्ध्वस्त झाली असून पिके पुराच्या पाण्यात बुडाली आहे.
नदी काठच्या पळशी गावात पाणी शिरल्याने सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पळशीला सन २००६ ला महापूराचा तडाखा बसला होता.त्यानंतर सन २०२५ ला पुराचे पाणी गावात शिरल्याने गावकर्यांना भिती निर्माण झाली आहे. तसेच तालुक्यातील देवसरी,साखरा,चातारी, चालगणी, उंचवडद,दिघडी या गावाचा संपर्क तुटला आहे. नागरिकांच्या मदती साठी उपविभागिय अधिकारी सखाराम मुळे , तहसिलदार राजेश सुरडकर , पोफाळी ठाणेदार पंकज दाभाडे या कार्यात परिस्थीतीवर लक्ष ठेऊन आहेत.
पळशी गाव पूर्नवसन करण्यासाठी गावकर्यांनी अंदोलन केले उपोषण केले. शासणाकडे प्रस्ताव दिला (Panganga River flood) गाव पूर्नवसन करा शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तत्कालीन जिल्हयाचे पालकमंत्री मनोहरराव नाईक यांनी गावकर्यांना आश्वासन दिले गाव दतक घेऊन मॉस्टर पॅलने विकासा करून पूर्नवसन करू असे २००६ मध्ये आश्वासन दिले तेव्हा पासून गाव पूर्नवसन झाले नाही प्रस्ताव धूळखात पडला आहे.
२२० जणांचा सुरक्षित स्थळी आश्रय
शुक्रवार १५ ऑगस्ट पासून तालुक्यात १४५ टक्केवारी ऐवढया प्रमाणात पाऊस झाला. ईसापुर धरणाचे १३ गेट वर केल्याने (Panganga River flood) पैनगंगा पात्र दुधडी भरून वाहिले नदीकाठलग चे पळशी ( जुनी ) या एक हजार लोकवस्तीच्या गावात पाणी घुसले. गावात सोमवार १८ ऑगस्ट पासुन पुराच्या पाण्यात झपाट्याने वाढ झाल्याने ५५ घरे पाण्या खाली आली असून २२० बांधीत नागरिकांनी इतरत्र नातेवाईक यांच्या कडे आश्रय घेतला.
गावकर्यांचा गाव सोडवण्यास नकार एनडीआरएफ चे पथक फिरले माघारी
१८ ऑगस्ट रोजी ईसापुर धरणाच्या पाण्याचा विसर्ग वाढविल्याने उमरखेड तालुक्यातील पळशी व संगम चिंचोली या (Panganga River flood) गावात पुराचे पाणी घुसल्याने या दोन्ही गावाच्या संपर्क तुटला आहे. गावातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थलांतर करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून एनडीआरएफ ची ८ सदस्यीय टीम दाखल करण्यात आली होती. परंतु पळशीतील ग्रामस्थांनी गाव सोडून जाण्यास नकार दिल्याने एन डी आर एफ च्या पथकाला माघारी परतावे लागले.
सामाजिक दाईत्व भावनेतून बाधितांसाठी भोजनाची व्यवस्था
सामाजिक दाईत्वाच्या भावनाने स्थानिकांकडून बाधीत झालेल्या नागरिक यांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात साठी मदत केली. तसेच त्यांची भोजन व्यवस्था केली. या मध्ये चिंतागराव कदम , गजानन सोळंके , रामदास कदम , विश्वास जाधव , सुनिल कदम , रामराव चिकने , तलाठी किर्ती माखने , मंडळ अधिकारी शिवनकर , कृषी सहाय्यक प्रकाश इंगळे याचा सहभाग आहे.
ईसापुरला पुराचा वेढा
शेंबाळपिंपरी : पुसद तालुक्यातील ईसापुरधरणाच्या पायथ्याशी असलेले पाच हजार लोकसंख्येचे ईसापुर हे गाव आहे. १७ ऑगस्ट ला धरणाचे तेरा दरवाजे उघडण्यात आणि पैनगंगा नदीकाठील हजारो हेक्टर शेतीतील पिके जलमय झाली. मुसळधार पाऊस आणि धरणातूनसुटलेल्या मोठ्या प्रमाणावरील पाण्यामुळे ईसापुर मार्गावरील दोन्ही नाल्यांना मोठा पुर आला.१८ ऑगस्ट ला धरणातील वाढविण्यात आलेल्या (Panganga River flood) पाण्याच्या विसर्गामुळे पाणी तुंबले आणि हे पाणी ईसापुर गावात वळले. पुरग्रस्त रेड झोन मधील पंधरा ते वीस घरात पाणी आले त्यामुळे अनेक कुटुंबांनी मिळेल तेथे सहारा घेणे सुरु केले काहींनी शाळेत आश्रय घेतला.
आज शेंबाळपिंपरी, देवगव्हाण, गौळ बु., जगापुर आदी गावांचा महसुल अधिकार्यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी केली मात्र पुराच्या वेढ्यात सापडलेल्या ईसापुरला पुरामुळे साधे जाणेही शक्य झाले नाही.ईसापुरला गेल्या तीन दिवसांपासून पुराच्या पाण्याने वेढा दिलेला आहे. गावकर्यांना बाहेर जाण्यासाठी कुठलाही मार्ग नाही. परिस्थिती बिकट निर्माण होत असतांना शासनाने तातडीने मदत पोहोचवावी अशी मागणी येथील सरपंच अजमत खान यांनी देशोन्नती शी बोलताना केली आहे.