35 जुगार्यांना अटक, 45 लाख 21 हजाराचा मुद्देमाल जप्त!
पांढरकवडा (Pandharkawada) : एलसिबीच्या पथकाने 25 जानेवारी रोजी रात्री 12.30 वाजता दरम्यान तालुक्यातील पाटणबोरी येथील जॅकपॉट वाईनबार मध्ये सुरु असलेल्या कोल सिटी सोशल क्लबवर धाड मारुन 35 जुगार्यांना जुगार खेळतांना ताब्यात घेवुन त्यांच्या जवळुन 2 लाख 96 हजार 90 रुपये रोख, सहा चारचाकी वाहने, 29 मोबाईल, जुगार साहित्य, टेबल खुर्च्या व विदेशी दारु असा एकुण 45 लाख 21 हजार 540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 26 जानेवारी निमित्त कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी (Superintendent of Police) 25 रोजी एलसिबीच्या (LCB) विविध पथकाची गस्त वाढविली होती. तसेच पाटणबोरी येथील सोशल क्लबची तपासणी करण्याचे लेखी आदेश 25 रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ (District Collector Yavatmal) यांनी एलसिबीला दिले होते.
सोशल क्लबवर धाड!
सोशल क्लबची (Social Club) तपासणी करण्याकरीता जिल्हाधिकार्यांनी पिएसआय धनराज हाके यांची नियुक्ती केली होती. पिएसआय हाके यांनी जि. पो. अधिक्षक व एलसिबी पि आय यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अजयकुमार वाढवे, एपीआय विजय महाले, पिएसआय गजानन राजमल्लु यांच्यासह दहा ते पंधरा पोलीस कर्मचार्यांसह (Police Officer) केळापुर तालुक्यातील पाटणबोरी येथील जॅकपॉट वाईनबार मध्ये सुरु असलेल्या राजेश अण्णाच्या कोल सिटी सोशल क्लबवर धाड मारली. यावेळी त्यांना क्लबमध्ये अनेक जुगारी जुगार खेळतांना आढळुन आले.
सदर क्लबला रात्री 10 पर्यतच परवानगी असतांना व तेथे नगदी पैशाएैवजी कॉईन सिस्टीमची परवानगी असतांना जुगारी नगदी पैशाने जुगार खेळतांना आढळुन आले. पथकातील पोलीस अधिकारी,कर्मचार्यांनी तेथे जुगार खेळत असलेल्या संतोष के सुदर्शन 46 लोकेश्वर मंडळ जिल्हा निर्मल, व्यंकटेश परलु सुब्बाराव 47 रा गुड्डवन पालम जिल्हा प्रकाशम, श्रीनिवास रंगाराजु सरस्वती 52 रा भगत नगर जिल्हा करीमनगर, टि संतोष मधुकर तारपेल्ली 49 रा भोक्तापुर जिल्हा अदिलाबाद, एम शेखर सुदर्शन मेदरी 32 रा हंसापुर जिल्हा निजामाबाद, गजानन ईस्तारी राजन 40 रा भेदोडा जिल्हा आदिलाबाद, गोणे मनोहरराव रामचंद्रराव 64 रा बालाजी रेसीडेंन्सी सेवन हिल्स जि मंचेरीयल, अंजनिल नारायण मेरगु 38 रा साई हनुमान नगर जिल्हा मंचेरीयल, कोंडलराव लिंगाराव श्रीगोंड 44 रा बेगमपल्ली चौरस्ता जिल्हा मंचेरीयल, बालाली जगन्नाथ खन्ना 48 रा प्रगती नगर जिल्हा निजामाबाद, पुली तिरुपती साया गौड्डु 65 रा मोढेवाड जगतीयल जिल्हा करीमनगर, विजय भास्कर गंगारेड्डी 58 रा रामापुर डिचपल्ली जिल्हा निजामाबाद, पुरुषोत्तम भुमय्या ताटिकोंडा 59 रा पेटपल्ली जिल्हा जगदतियाल, गुंडढरावी कुम्मालु गुंडेटी 35 रा संगेम जिल्हा वरंगल, मो.हारुण रशिद मो शमसोद्दीन 38 रा जग्गतीयाल तेलंगणा, चंदरराव रमेश चिन्ना 25 रा करीमाबाद जिल्हा वरंगल, व्यंकट लाल वैâरा 60 रा जग्गीदत्यालय तेलंगणा, राजु उशन्ना पारपेल्ली 30 रा जिम्मा जिल्हा अदिलाबाद, राजेश्वर बुचचीरेड्डी रतनावार 52 रा चैनोंर जिल्हा मंचेरीयाल, राजेन्द्र किष्टया थोटा 50 रा मुलकला जिल्हा मंचेरीयाल, कृष्णम्माचारी लक्ष्मीनारायण यदुलाबाद 48 रा बोनगिरी जिल्हा यादाद्री, मनोजकुमार विजयकुमार कोयाडा 31 रा पोपालागुट्टा जिल्हा वरंगल, राजु कोमरय्या अंकती 43 रा मोगली चरण जिल्हा वरंगल, श्रीनिवास मारकंडय्या दौंतुला 46 रा परकल जिल्हा वरंगल, जगदीश्वर विरेशंम गोरंटी 50 रा सुभाषनगर निजामाबाद, शंकर चेरालु कोडीगुडी 56 रा मलकाजगिरी जिल्हा हैद्राबाद, मनोहर किष्टय्या वडलागट्टु 51 रा अदिलाबाद, रविन्द्रराव जगाराव चिटीनेनी 55 रा बेलमपल्ली जिल्हा मंचेरीयाल, महेन्द्र मलेशंम गोरे 43 रा लक्ष्मीपुरम जिल्हा मंचेरीयाल, रामदेव चंदु गुगुलोत 46 रा गुडलसिंगराम जिल्हा मुलगु, व्यंकटेश यादगिरी जल्ला 47 रा अन्नानगर सिंगदराबाद, सुभाष अडेल्लु मोहिजे 51 रा तरोडा जैनत जिल्हा अदिलाबाद, कंदी दामोधर राजा रेड्डी 64 जन्मभुमी नगर जिल्हा मंचेरीयाल, वाय राजेशकुमार वाय सुंदरराव 52 रा आकोली तालुका केळापुर, ज्ञानेश्वर उध्दव देवगडे रा भद्रावती जिल्हा चंद्रपुर यांना ताब्यात घेवुन त्यांच्या जवळुन रोख रक्कम,वाहने,मोबाईल व ईतर मुद्देमाल जप्त (Seized Property) करुन त्यांच्या विरुध्द गुन्हे दाखल केले आहे.




