परभणी/सेलू (Parbhani):- तालुक्यातील वालूर – हातनूर रस्त्यावर असलेल्या दोन सोलार प्लांटमधून (Solar plant) १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमला अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. चोरांनी ८ हजार फुट लांबीची तांब्याची तार चोरून नेली. ही घटना ९ जानवोरी रोजी सकाळी उघडकीस आली. अज्ञात चोरट्यावर सेलू पोलीसात गुन्हा (Crime)दाखल करण्यात आला आहे.
चोरांनी ८ हजार फुट लांबीची तांब्याची तार केली लंपास
वालूर – हातनूर रस्त्यावर अशोक अण्णासाहेब काकडे यांच्या सोलार प्लांटवरील ३ हजार फुट लांबीची ८० हजार रुपये किंमतीची तांब्याची तार तसेच आर.बी. घोडके यांच्या सोलार प्लांटवरील ५ हजार फुट लांबीची तांब्याची तार चोरांनी लंपास केली. १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. गोविंद दत्तात्रय राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर सेलू पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोनि. दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. गणेश पवार तपास करत आहेत.