शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवाळीच्या सुरुवातीला आंदोलन!
परभणी (Parbhani Aandolan) : जिल्ह्यातील अतिवृष्टी (Heavy Rain) व पूरग्रस्त शेतकरी, नागरिकांच्या शेतकरी संघर्ष समितीच्या (Farmers Struggle Committee) वतीने शुक्रवार १७ ऑक्टोबर रोजी पिठलं भाकर आंदोलन करत सत्ताधार्यांच्या विरोधात आक्रोश मोर्चा (Outcry Front) काढण्यात आला. ऐन दिवाळीच्या सुरुवातीलाच शेतकर्यांनी आंदोलन करत आपल्या मागण्या मांडल्या आहेत.
आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले!
शेतकर्यांच्या (Farmers) पदरात ठोस मदत मिळालेली नाही. ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज म्हणजे चलाखीने केलेला आकड्यांचा खेळ आहे. शेतकर्यांना प्रति हेक्टरी ७० हजार रुपयांची नुकसान भरपाई द्या या मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी, जमिन सुधारण्यासाठी मदत करावी, बाधीत पिकांचा नियमानुसार संपूर्ण पीक विमा अदा करावा, कर्ज पुनर्गठण न करता संपूर्ण कर्जमुक्ती करावी, पुरात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या वारसांना २५ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, शेतमजुरांना अतिवृष्टी काळातील दररोज ५०० रुपये प्रमाणे मोबदला अदा करावा, जिल्हा परिषद सर्कलच्या मुख्य गावात सोयाबीन खरेदी केंद्रे तात्काळ सुरु करावीत, पुरात वाहून गेलेल्या पशुधनासाठीच्या अनुदानात वाढ करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. निवेदनावर कॉ.अॅड. माधुरी क्षीरसागर, माणिक कदम, कॉ. राजन क्षीरसागर, सोनाली देशमुख, इरशाद पठाण, कॉ. ओंकार पवार, शिवहार सोनटक्के, कॉ. शिवाजी कदम, सुरेश इखे, शिवलिंग बोधणे, कॉ. शेख अब्दुल, फेजुल्ला खॉ पठाण, इरशाद पाशा चाँद पाशा यांच्या स्वाक्षर्या आहेत.