परभणी/नांदापूर (Parbhani):- चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने स्विफ्ट डिझायर (Swift Desire) गाडी घरात घुसल्याची घटना तालुक्यातील नांदापूर येथे रविवार ७ जुलै रोजी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले
या बाबत अधिक माहिती अशी की, परभणीहून जिंतुरकडे जात असलेली स्विफ्ट डिझायर क्रमांक एमएच ०६ बी.ई. ९४९९ या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या घरात गाडी घुसली. त्यामुळे चालकासह इतर दोन प्रवाशी गंभीर जखमी (seriously injured) झाले. स्विफ्ट डिझायर रस्ता सोडून घरात घुसल्याने अंगणात बांधलेल्या दोन बैलांचे नाक तुटून ते गंभीर जखमी झाले. सुदैवाने अपघातात जीवित हानी झाली नाही. गंभीर जखमी चालक व प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात(Hospital) दाखल करण्यात आले. अद्याप गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.
चालकासह दोन प्रवासी गंभीर
परभणी तालुक्यातील नांदापूर येथे रविवारी स्वीफ्ट डिझायर कारच्या चालकाचे वाहनावरील अचानक नियंत्रण सुटले. कार एका घरात शिरली. या अपघातातचालकासह दोन प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.