परभणीत पत्रकार परिषद
जिल्हाध्यक्ष माजी आ.बाबाजानी दुर्राणी यांची माहिती
परभणी (Parbhani Congress Election) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत काँग्रेसने स्वबळाची तयारी केली आहे. मात्र समविचारी पक्षांसोबत बोलणी सुरु आहे. त्यामुळे त्यांनाही सोबत घेऊन जिल्हा परिषद, मनपा निवडणूक काँग्रेस पक्ष लढणार असल्याची स्पष्टोक्ती नूतन जिल्हाध्यक्ष माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शनिवारस्थित जिल्हा काँग्रेस कमिटीच्या राजीव गांधी भवनात गुरुवार ३० ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष माजी आ. दुर्राणी आगामी जिल्हा परिषदेसह पंचायत समिती, नगर परिषदा आणि मनपा निवडणूकी (Parbhani Congress Election) संदर्भात माहिती दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यात महायुतीच्या काळात गेल्या दहा वर्षात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे.
प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. शेतकरी संकटात आहे. सर्वसामान्य जनता महागाई आणि बेरोजगारीने त्रस्त आहे. त्यामुळे सरकारविषयी जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे. सरकारच्या विरोधात लवकरच मोर्चा काढण्यात येणार आहेत. शिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती, मनपा, नगर पालिका निवडणूकीत स्वबळावर लढण्याची काँग्रेसने तयारी केली आहे, मात्र समविचारी पक्ष सोबत आले तर त्यांनाही सोबत घेतले जाईल असे सांगितले.
जागा वाटपात देखील काही बदल होणार नाही, निवडून येऊ शकतील, अशाच निष्ठावंत उमेदवारांना काँग्रेस संधी देणार आहे. काही जागावर बदल होऊ शकतो. शिवसेना, राष्ट्रवादीची शकले पडली आहेत. त्यामुळे त्याचा फायदा निश्चितच काँग्रेस पक्षाला मिळेल. माजी मंत्री सुरेश वरपूडकर भाजपात गेल्यामुळे काही फरक पडणार नाही. उलट भाजपाच्या मनातील दोनज जागा कमी होतील, असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना मित्र पक्ष असलेल्या शिवसेना उबाठावरही माजी आ. दुर्राणी स्पष्ट मत मांडले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणूकीत (Parbhani Congress Election) त्याचा प्रत्यय आला आहे. काँग्रेसची मते दोन्ही निवडणूकीत उबाठा शिवसेनेला मिळाली. मात्र उबाठाची मते काँग्रेसला मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र ग्रामीण जनता आजही काँग्रेससोबत आहे. पक्षाला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत त्याचा फायदा होईल.
आता जिल्हा काँग्रेस पक्षात कुठलही गटबाजी दिसून येणार नाही. आम्ही सर्व मिळून काम करु असे सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी आ. सुरेश देशमुख, अनु. जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबीरे, बाळासाहेब देशमुख, भगवान वाघमारे, गणेश घाडगे, नदीम इनामदार, मलेका गफार, दुर्राणी खानम, रवि सोनकांबळे, गुलमिर खान, विनोद कदम, अमोल जाधव आदींची उपस्थिती होती.




