नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
परभणी (Parbhani Crime) : पोलिस असल्याची बतावणी करुन एका वृध्द शेतकर्यास भर दुपारी गजबजलेल्या आरआर टावर परिसरात लुटल्याची घटना ६ मार्च रोजी घडली. भामट्याने ८० हजार ७३८ रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. या (Parbhani Crime) प्रकरणी वृध्द शेतकर्याने शनिवार ८ मार्च रोजी नानलपेठ पोलिस (Nanalpet Police) ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन अज्ञात भामट्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असोला येथील शेतकर्याचे ८० हजाराचे दागिने लंपास
याबाबत पोलिस (Nanalpet Police) सुत्रानी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील असोला येथील शेतकरी एकनाथ मारोतराव जावळे वय ७२ वर्ष हे गुरुवार ६ मार्च रोजी परभणी शहरात भाचा याच्या पत्नीस सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी आले होते. गांधी पार्क परिसरातील उमेश ज्वेलर्स या दुकानातून त्यांनी सोन्याचे झुंबर जोड व सोन्याची फुल असे एकुण ९ ग्रॅम ८० हजार ७३८ रुपये किंमतीचे दागिने खरेदी केले.
सोनाराने दागिने घेऊन जाण्यासाठी सायंकाळी साडे चार वाजता बोलावले. त्यानूसार एकनाथ जावळे हे सायंकाळी सराफा दुकानावर गेले. दागिने असलेली डब्बी पिशवीत ठेवूनते अष्टभूजादेवी परिसरातील भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी गेले. तेव्हा एक इसम त्यांच्याजवळ आला. मी (Parbhani Crime) पोलिस आहे, तुमच्या पिशवीत गांजा आहे, तुमची पिशवी तपासायची आहे, म्हणून एकनाथ जावळे यांना एका बोळीमध्ये घेऊन घेतला.
पोलिस असल्यामुळे एकनाथ जावळे यांनी घाबरुन पिशवी त्याच्याकडे दिली. सदर इसमाने नकळत सोन्याचे दागिनेअसलेली डब्बी काढून घेऊन पिशवी परत केली आणि निघून गेला. गावी परत गेल्यानंतर एकनाथ जावळे यांनी घडला प्रकार लहान भाऊ संभाजी जावळे व पोलिस पाटील पंढरीनाथ रिक्षे यांना सांगितले. त्यांनी पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिल्यानंतर शनिवार ८ मार्च रोजी (Nanalpet Police) नानलपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन अज्ञात इसमाविरुध्द फसणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास (Parbhani Crime) नानलपेठ पोलिस करत आहेत.