परभणी/सेलू (Parbhani):- शहरातील सातोना रस्त्यावर असलेल्या वाहिद पठाण यांच्या ऑक्सी डीलक्स या वॉटर प्लांटसमोर (Water plant)उभा केलेला मालवाहू पिकअप अज्ञात दोन चोरट्यांनी चोरुन नेल्याची तक्रार सदानंद भिसे यांनी गुरुवार १८ जुलै रोजी सेलू पोलीस ठाण्यात दिली. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात (CCTV cameras)कैद झाली आहे. या प्रकरणी दोघा चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही कॅमेर्यात चोरटे कैद
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी सदानंद भिसे रा.कोल्हावाडी ता. मानवत हे आपल्या वाहनाद्वारे सातोना रस्त्यावर असलेल्या वाहिद पठाण यांच्या ऑक्सी डिलक्स (Oxy Deluxe)या प्लांटवर पाणी विक्रीचा व्यवसाय करतात. तालुक्यातील वालूर येथील वाहेदखान हमीदखान यांचा सातोना रोडवरील ऑक्सी डिलक्स चा वॉटर प्लंट आहे. या पाणी बॉटलच्या बॉक्स वितरणाचे काम करतात. दिवसभर पाणी बॉटलचे बॉक्स विक्री करुन सायंकाळी गावाकडे परत जाताना सातोना रस्त्यावर या वॉटर प्लांटच्या भिंतीलगत वाहन उभे करतात. १६ जुलै रोजी भिसे यांनी त्यांचा MH.22.AN.2261 या क्रमांकाचा पिकअप उभा करुन गावाकडे परत गेले. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास प्लांटमालक वाहेद पठाण यांच्या निदर्शनास पिकअप चोरी गेल्याचे दिसून आले.
इतर ठिकाणीही वाहन कॅमेर्यात कैद
मानवत तालुक्यातील कोल्हावाडी येथील सदानंद भीसे हे वालूर येथील अक्षय डीलक्स प्लांटचे मालक वाहेद पठाण यांच्या कंपनीत पाणी बॉटल्स वितरणाचे काम करतात. १७ जुलैच्या रात्री झालेली चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. तीन व्यक्ती पिकअप चोरी करताना दिसत आहेत. याप्रकरणी सदानंद भिसे यांनी १८ जुलै रोजी सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हे वाहन इतर ठिकाणी देखील आढळून आल्याची माहिती अक्षय डीलक्स प्लांट चे मालक वाहेद पठाण यांनी दिली.




