ग्रामस्थांनी केली तारा बदलण्याची मागणी
परभणी/पालम (Parbhani Electric cable) : तालुक्यातील मौजे सादलापुर गावात विज चोरी रोखण्यासाठी गावभर केबल वायर टाकण्यात आले होते. मात्र सध्या हे केबल वायर जीर्ण झाले असून आतील तार उघडे पडले आहेत. त्यामुळे (Parbhani Electric cable) मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरणने तारा बदलाव्यात, अशी मागणी सादरलापूर ग्रामस्थांतून होत आहे.
केबल काम पूर्ण केल्याचे दाखवण्याच्या उद्देशाने संपूर्ण गावामध्ये निकृष्ट दर्जाचे केबल वायर टाकण्यात आले आहे. या (Parbhani Electric cable) वायरच्या माध्यमातून होणारा विद्युत पुरवठा हा त्याच्या भार क्षमतेपेक्षा जास्तीचा होत असल्याने वारंवार केबल वायर जळून तुटून रस्त्यावर पडत आहे.
त्यामुळे गावातील लहान थोर व्यक्तींसह प्राण्यांच्या सुद्धा जीवितास धोका निर्माण होत आहे. या संदर्भात पेठशिवणी येथे विद्युत कंपनीच्या लाईनमन यांच्याकडे दूरध्वनीद्वारे या घटनेची माहिती देण्यात आली आहे. मात्र अद्यापही लक्ष दिले नाही. महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.