परभणी/पूर्णा(Parbhani/Poorna):- झिरोफाटा ते पूर्णा रस्त्यावर सुरू असलेल्या एका पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराने खोदून ठेवलेल्या खड्डयात इनोव्हा कार (Innova car) कोसळून झालेल्या अपघातात दोघे किरकोळ जखमी झाल्याची घटना पूर्णा तालुक्यातील माटेगाव शिवारात रविवार दि.२८ रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली आहे. अपघात एवढा भिषण होता गाडीचे नुकसान होऊनही दैव बलवत्तर म्हणून गाडीतील दोघांचे जीव वाचले.
पुलाचे पिल्लर उभारणीसाठी दोन ते तीन २५ ते ३० फुटाचे खोल खड्डे
सा .बां विभागाने पूर्णा -झिरोफाटा राज्य रस्ता क्र.२४९ वरील माटेगांवा गावाजवळील थुना नदीवरील जुन्या पुलाचे नव्याने निर्माण (Reconstruction of the bridge) कार्य हाती घेतले आहे. यासाठी संबंधित कंत्राटदाराने जुना पूल पाडून नवीन पुलाचे पिल्लर उभारणीसाठी दोन ते तीन २५ ते ३० फुटाचे खोल खड्डे खोदून ठेवले आहेत. रविवार दि.२८ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास नांदेड कडून परभणी कडे जात असलेल्या एका एम.एच२६/बी.सी/७७०७ या इनोव्हा कारने नांदेड (Nanded)येथून शुभम मुंजाजी पोशट वय ३० रा. सुनेगांव जिल्हा नांदेड. विजय माणीकराव वाडेवाले वय ३५ रा. पेठशिवणी ता. पालम हे दोघे जात होते.
पाच ते सहा फूट पाणी असल्याने
दरम्यान त्यांचे वाहन माटेगांव शिवारात आले असता रस्त्यावर सुरू असलेल्या खड्डयात जाऊन उलटले . कामाबाबत कोणत्याही प्रकारची दिशादर्शक फलक नसल्याने तसेच कामावरील मोठे लावलेले एल ईडी लाईट (LED light) यांचा उजेड डोळ्यावर पडल्याने त्यांचे वाहन थेट २५ फुट खड्डयात जाऊन कोसळल्याचे चालकाने सांगितले आहे. खड्डयात पाच ते सहा फूट पाणी असल्याने व त्यांचा गंभीर दुखापत झाली नाही. मात्र वाहनाचे अतोनात नुकसान झाले आहे.
मोठे अपघात घडून अनेक जण जखमी
पुलाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्डयाच्या बाजूने बाह्य वळण काढून देण्यात आलेले आहे.बाह्यवळण रस्ता हा सुस्थितीत करून न दिल्याने येथे वेळोवेळी लहान मोठे अपघात घडून अनेक जण जखमी होत आहेत. या घटनेची माहिती माटेगांव पो.पा.स्वामी तसेच सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कु-हे यांनी पूर्णा पोलीसांना दिली आहे. घटनाथळी जमादार आमेर चाऊस व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपघात ग्रस्त वाहन ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही पोलिस करत असल्याचे समजते.