सेलू, सोनपेठमध्ये अडकलेल्यांना सुखरुप काढले
परभणी (Parbhani Heavy Rain) : मागील २४ तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात जनजिवन विस्कळीत झाले आहे. (Parbhani Heavy Rain) पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसानिच्या घटना घडल्या आहेत. मानवत तालुक्यातील वझूर बु. येथे मुक्कामी असलेली पाथरी आगाराची बस पुरात वाहून गेली. सुदैवाने बसचालक व वाहक यांनी समयसुचकता दाखवत बाहेर आल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
तर सेलू तालुक्यातील बोथ येथील पुरात अडकलेल्या दशरथ जोगदंड, राजेश जोगदंड, अमोल जाधव, एकनाथ जाधव या चार नागरीकांना राज्य आपत्ती प्राधिकरणाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले. जिंतूर तालुक्यातील बोर्डी येथे झाडावर अडकलेल्या व्यक्तीला सुध्दा वाचविण्यात आले आहे.
सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील फाल्गुनी नदीला पूर आल्याने शेत आखाड्यावर अडकलेल्या शेतकरी दाम्पत्यास प्रशासनाने मानवी साखळीच्या माध्यमातून बाहेर काढले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार सुनिल कावरखे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तर पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथील शेतकरी भगवान खुडे यांच्या शेत आखाड्यावरील ८० शेळ्यांपैकी ७० शेळ्या पाण्यात वाहून गेल्या. तर ४०० कोंबड्या मृत झाल्या. (Parbhani Heavy Rain) ढगसदृश्य पावसाने जिल्हाभरातील सोयाबिन, कापूससह इतर पिके पाण्याच्या खाली आल्याने नुकसान झाले आहे. हाताशी आलेल्या पिकांचे अतिवृष्टीच्या पावसाने नुकसान झाल्याने शेतकर्यांकडून पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात – जिल्हाधिकारी
जिल्ह्यातील ५७ महसूल मंडळापैकी ५० मंडळात अतिवृष्टी झाली असून आतापर्यंत ७१८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मानवी जिवीत हानीची कुठलीही घटना झाली नाही. तर पशुधनाच्या हानीची माहिती मिळत आहे. (Parbhani Heavy Rain) जिल्ह्यातील सर्व परिस्थिती नियंत्रणात असून पाणी ओसरल्यानंतर तात्काळ प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येतील.
– रघुनाथ गावडे, जिल्हाधिकारी




 
			 
		

