८ अनाधिकृत वातानुकुलीत यंत्र काढण्याची मागणी अनाधिकृत वातानुकुलीत यंत्र काढण्याची मागणी
परभणी (Parbhani MNS Protest) : मागील ६ महिन्यांपासून शासकीय कार्यालयातील अनधिकृत वातानुकूलित यंत्र काढण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिकेत ठिय्या आंदोलन करण्यात आले.
मनसे कडून या बाबत वेळोवेळी पाठपुरावा सुरू आहे, मात्र (Parbhani MNS Protest) मनपा अधिकार्यांमार्फत उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. तसेच वातानुकूलित यंत्र बाबत मागविण्यात आलेली मार्गदर्शनाची प्रत देत नव्हते, तसेच अनुकंपा लाभार्थी यांची गेल्या दीड वर्षांपासून हेतुपुरस्कर हेळसांड करण्यात येत आहे, शहर अभियंता यांचे लेखा परीक्षण झालेले असून लेखा आक्षेपावर कुठलीही कारवाई न झाल्याने व उपायुक्त बबन तडवी यांची दफ्तर तपासणी करावी.
त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामाची चौकशीच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी यांच्या नेतृत्वाखाली बुधवार ३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता मनपा आयुक्त यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी Parbhani MNS Protest मनसेचे जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी, मानविसे जिल्हाध्यक्ष अर्जुन टाक, शहर उपाध्यक्ष खंडू राऊत, महाराष्ट्र सैनिक आनंद शिंदे समवेत बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.