रुग्णांना तासंतास रांगेत उभा राहण्याची गरज नाही..
परभणी(Parbhani):- आभा अर्थात आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट नंबर च्या साह्याने आता जिल्हा रुग्णालयात जाऊन किंवा कोड स्कॅन करून ओपीडी पेपर काढता येणार आहे सोमवारपासून पाच कोड चिकटवून ही सुविधा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली असून यामुळे रुग्णांना तासंतास रांगेत उभे राहण्याची गरज नाही तसेच त्या त्या डॉक्टरांकडे जाऊन लगेचच वैद्यकीय सल्ला घेता येईल. एकंदर आभा या डिजिटल हेल्थ कार्डवर(Digital Health Card) आरोग्याशी संबंधित सर्व माहिती संकलित राहणार असून यामुळे डॉक्टर व रुग्ण दोघांचा वेळ वाचून वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या (District Hospitals) वतीने देण्यात आली आहे.
डिजिटल आरोग्य सुविधा
यात रुग्णास नेमका काय त्रास होत आहे कोणत्या आजाराची लक्षणे आहेत यापूर्वी कधी आजारी पडला होता कोणत्या दवाखान्यात उपचार घेतले कोणत्या तपासण्या केल्या औषधी कोणती दिली. रुग्ण कोणत्या आरोग्य योजनेशी जोडलेला आहे का आरोग्य विमा (Health insurance) आदी माहिती आभा कार्ड मध्ये समाविष्ट असल्यामुळे रुग्णावर उपचार करताना ती डॉक्टरांसाठी सहाय्यभूत ठरते तसेच नवीन डॉक्टर किंवा रुग्णालयात गेल्यास वैद्यकीय अहवाल किंवा प्रिसिपशन सोबत ठेवण्याची गरज नाही. आरोग्य विषयक इत्याभूत माहिती ऑनलाईन संकलित राहणार असल्यामुळे डॉक्टर व रुग्ण दोघांसाठी सोयीस्कर आहे. एवढेच नव्हे तर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा रुग्णांना उपचार घेता येऊ शकतात त्यामुळे प्रत्येकाने आभा कार्ड (Aura Card)काढण्याचे आवाहन जिल्हा रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे..
दैनंदिन ८०० ते ९०० ओपीडी
जिल्हा रुग्णालयात दैनंदिन आठशे ते नऊशे रुग्ण दाखल होतात .तर अत्यवस्थ रुग्णांची संख्याही १०० ते १५० वर आहे.
यातील काही रुग्णांवर वॉर्डात उपचार दीला जातो तर ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना ओपीडी पेपर काढण्यासाठी एक दोन तास रांगेत थांबावे लागते. त्यामुळे आता आभा कार्डमुळे तासंतास ओपीडी पेपर (OPD Paper) काढण्याकरिता लाईन मध्ये न थांबता रुग्णांचे काम जलद गतीने होणार आहे.
आभा कार्ड काढण्याकरिता सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती ..
जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या ज्या रुग्णांकडे आभा कार्ड नाही. त्या रुग्णांच्या मदती करिता किंवा त्यांना नवीन आभा कार्ड काढून देण्याकरिता सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती जिल्हा रुग्णालयाच्या वतीने करण्यात आली आहे..
आधार कार्ड व आधार लिंक मोबाईल सोबत असणे आवश्यक..
ज्या रुग्णांना नवीन आभा कार्ड काढायचे आहे त्या रुग्णांनी जिल्हा रुग्णालयात येताना सोबत आधार कार्ड ठेवणे आवश्यक आहे.तसेच आधार लिंक मोबाईल ही सोबत आणणे आवश्यक आहे.ते तेथील कर्मचाऱ्यांना दाखवून रुग्णांना तेथील कर्मचारी आभा कार्ड काढण्यास रुग्णांना मदत करतील..
ऑनलाइन सुविधेचा रुग्णांनी लाभ घ्यावा..
जिल्हा रुग्णालयात उपलब्ध उपचार सुविधांमुळे रुग्णांचा ओढा उत्तरोत्तर वाढत आहे. यामुळे ओपीडी पेपरची मोठी गर्दी होत आहे. यावर आभा कार्डच्या माध्यमातून किंवा क्यूआर कोड स्कॅन करून ओपीडी पेपर काढण्याचा पर्याय दिला आहे.. यामुळे या ऑनलाइन सुविधेचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा. जेणेकरून ओपीडी पेपर काढण्यासाठी रुग्णांना तासंतास लाईन मध्ये उभा रहण्याची वेळ येणार नाही.