पोलीस मुख्यालयात “एक पेंड मा के नाम” वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
परभणी (Parbhani Police) : वन विभाग आणि परभणी पोलिसांच्या (Parbhani Police) संयुक्त विद्यमाने शुक्रवार २६ जुलै रोजी पोलीस मुख्यालयात वृक्षारोपण (Trees Plantation) करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवडणूक उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते, विभागीय वनअधिकारी डॉ. राजेंद्र नाळे, पोनि. रवि बानते, ऋषिकेश चव्हाण, देवकते, सायमा पठाण यांची उपस्थिती होती.
वन विभाग व जिल्हा पोलीस अधीक्षक याच्यां संयुक्त उपक्रम
यावेळी बोलताना (Parbhani Police) पोलीस अधीक्षक म्हणाले की, पोलीस मुख्यालयासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये वृक्षारोपण (Trees Plantation) करण्यात येणार आहे. झाडांची वाढ आणि संगोपनासाठी सदरची झाडे पोलीस अंमलदारांना दत्तक देण्यात येणार आहेत. आभार प्रदर्शन ऋषिकेश चव्हाण यांनी केले. परभणी जिल्ह्यात एक हजार झाड लावण्याचा संकल्प व संगोपन करण्यात येणार असल्याची, माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक माध्यमशी बोलतांना दिली.