दोन चालकासह दोन जणावर गुन्हा दाखल १२ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
परभणी (Parbhani Police) : सेलू शहरातील राष्ट्रीय महामार्ग ५४८ बी देवगाव फाटा पाथरी या रस्त्यावर सेलु परिसरात दोन वाहने गस्तीवरील पोलीस पथकाने रायगड कॉर्नर वरून पाठलाग करत पाथरी रस्त्यावरील नूतन कॉटन जिनिंग समोरील रस्त्यावर ताब्यात घेतले आहे. या (Parbhani Police) दोन वाहनातून १२ गोमुंश बैलासह १२ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही (Parbhani Police) घटना १२ जून रोजी मध्यरात्री २:२० वाजता घडली असून गुन्हा पहाटे ५:५५ वाजता दाखल करण्यात आला आहे. याबाबत पो लीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे शहरातील रायगड कॉर्नर परिसरात रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार, पोलीस नायक सर्वश्री सोपान बारवकर, जगन्नाथ मुंढे, गजानन जायभाय, मनोहर कोपनार ,यांच्या पथकाने ताडपत्री बांधून आलेली दोन वाहने थांबविण्याचा प्रयत्न केला असता दोन वाहनाच्या चालकाने वाहने न थांबविता सुसाट वेगाने पाथरीच्या दिशेने नेत असताना पोलीसांनी पाठलाग करून नूतन कॉटन जिनिंग च्या समोर पकडले.
या दोन्ही वाहनात मिळून १२ गोवंश बैल होते. आरोपीसह दोन्ही वाहने ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीस्तव पोलीस ठाण्यात लावण्यात आले. ही कार्यवाही १२ जून रोजी मध्यरात्री २:२० वाजता करण्यात आली. (Parbhani Police) दोन्ही वाहन आणि १२ बैल असा १२लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक गणेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र प्राणी संरक्षण व विविध कलमानुसार मो.फैजान शेख सगीर वय २१ वर्षे चालक राहणार इस्लामपुरा सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव, सलमान इसाक कुरेशी वय २१ वर्षे खाजा नगर वरणगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव ,शेख हयात शेख मासूम वय २५ वर्षे चालक राहणार मन्यार मोहल्ला चिनावल तालुका रावेर जिल्हा जळगाव, शेख आपेश शेख एजाज वय २० वर्षे खाजा नगर सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश पुलाते पुढील तपास करत आहेत. दरम्यान सेलू शहरातून सेलू ते परभणी व सेलू ते पाथरी या रस्त्यावर पाथरी आणि परभणी येथील जनावराच्या आठवडी बाजारच्या पूर्वी सर्रासपणे गोवंश बैल भरून वाहतूक करण्यात येत असते ते या पकडलेल्या वाहनावरून स्पष्ट झाले आहे.




