सेलू शहरात होतेय गांजाची सर्रासपणे विक्री एका आरोपीस घेतले ताब्यात!
परभणी (Parbhani Police) : परभणीच्या सेलू शहरातील गायत्री नगर परिसरात एका तरुणाच्या घरी गांजा (Marijuana) असल्याचे पोलीस पथकाला (Police Squad) कळताच गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (Crime Investigation Department Team) धाड घालत 260 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी 24 मे रोजी रात्री 9:40 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गायत्री नगर परिसरात एका पांढऱ्या रंगाच्या कॅरीबॅग मध्ये अमली पदार्थ!
याबाबत पोलिसांनी (Police) दिलेली माहिती याप्रमाणे शहरातील गायत्री नगर परिसरात एका पांढऱ्या रंगाच्या कॅरीबॅग मध्ये अमली पदार्थ असलेला हिरवट रंगाचे पाने काड्या आणि बिया मिश्रित मोकळा असलेला 260 ग्राम गांजा किंमत 5 हजार दोनसे रुपये पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch) परभणीचे पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एन डी पी एस ऍक्ट कलम 8 क, 20 ब, अन्वये अन्वये सुनील अंकुश टाके राहणार गायत्री नगर सेलू याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे (Police Inspector Deepak Borse) हे करत आहेत.
गांजाने शहर ग्रासले पाच हजारावर तरुण व्यसनाच्या विळख्यात!
सेलू शहरात राजीव गांधी नगर, मंत्री नगर, गायत्री नगर, महाविद्यालय परिसरासह इतर ठिकाणी गांजा आणि नशेची तसम पदार्थ सहज उपलब्ध होतात. गांजा विक्रीत सक्रिय असलेल्या या टोळीचा घरपोच सेवा देण्याच्या प्रकाराने देखील कळस गाठला आहे. शहरात हजारावर तरुण या नशेच्या (Drunk) आहारी अडकले आहेत.




