कुकुटपालनाच्या जाळीत बसला होता अडकून; सर्पमित्र सौरभ पवार यांची कामगिरी!
परभणी (Parbhani Python) : शहरापासून काही अंतरावर असलेल्या जिजाऊ मंदिरासमारील शेतामधील कोंबड्यांच्या शेडच्या जाळीला अडकलेल्या तब्बल 9 फूट लांब व 8 किलो वजनाचा असलेला अजगर जातीच्या सापाला सर्पमित्र (Snake Friend) सौरभ पवार यांनी तब्बल एक तासाच्या प्रयत्नानंतर, पकडून त्यास निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले.
अजगर जातीचा साप पकडण्यात सर्पमित्रांना यश आले!
सदरील घटना शनिवार 26 जुलै रोजी परभणी शहरापासून 8 किमी अंतरावर असलेल्या त्रिधारा जवळ असलेले जिजाऊ मंदिरा समोर सुरसे यांच्या शेतात घडली. शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप चालू होती. सुरसे यांच्या शेतात कुकूटपालन आहे. शेतातील काम करणारा गडी रोजच्या सारखं साफ सफाई करत होता. काम करताना त्याला अचानक कुकूटपालनाच्या जाळी मधे काहीतरी अडकलेले दिसून आले, जवळ जाऊन बघितले असता त्याला भला मोठा साप असल्याचे दिसले. तो घाबरला, त्याने लगेच शेताचे मालक प्रवीण सुरसे यांना संपर्क केला आणि पूर्ण परिस्थिती सांगितली. सर्पमित्राचा नंबर नसल्याने सुरसे यांनी त्यांचे मित्र असलेले नगरसेवक प्रसाद नागरे यांना संपर्क केला. प्रसाद नागरे यांनी सर्पमित्र सौरभ पवार आणि अभिषेक पुसदकर यांना तात्काळ संपर्क केला. व लगेच सर्पमित्रांना सोबत घेऊन प्रसाद नागरे त्या ठिकाणी पोहोचले. सर्पमित्रांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता, भला मोठा अजगर जातीचा साप त्या जाळीमधे अडकलेला त्यांना दिसला. तब्बल 1 तासाच्या परिश्रमानंतर, तो अजगर जातीचा साप पकडण्यात सर्पमित्रांना यश आले. सदरील अजगराचे वजन 8 किलो असून त्याची लांबी 9 फूट आहे. सुरसे यांच्या शेताच्या मागे मोठा नाला आहे. साप त्या नाल्यामध्ये वाहून कोंबडी खाण्या साठी तेथे आल्याचा अंदाज सर्पमित्राचा आहे.
अजगराला पकडल्यानंतर, सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. अजगर हा साप पूर्णपणे बिनविशारी असतो. आपल्या भक्ष्याला वेटोळे घालून मारतो. असे सर्पमित्र सौरभ पवार यांनी सांगितले. सर्पमित्रांनी नंतर तो साप तात्काळ निसर्गात सोडून दिला.