मयत देहगाव येथील रहिवाशी; मयताच्या नातेवाईकांचा घातपाताचा संशय…!
परभणी (Parbhani Suspicious body) : मानवत तालुक्यातील नरळद येथे कॅनॉलच्या कडेला एक तरुण बेशुध्दावस्थेत मंगळवारी रात्रीच्या सुमारास पडलेला दिसून आला. या (Parbhani Suspicious body) घटनेची माहिती मिळालेल्या मित्रांनी त्याला मानवत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, त्यानंतर त्याला परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र बुधवार २३ एप्रिल रोजी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यास मृत घोषित केले. नंदू सुदाम जमदाडे वय २५ वर्ष. रा. दहेगाव, ता.पाथरी असे मयत तरुणाचे आहे.
याबाबत पोलिस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदु सुदाम जमदाडे हा तरुण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी नरळद येथे मंगळवार २२ एप्रिल रोजी आला होता. रात्री मिरवणूक संपल्यानंतर तो दुचाकीवरुन दहेगावकडे परत जात होता. मात्र (Parbhani Suspicious body) नरळद येथील कॅनॉलच्या कडेला नंदु सुदाम जमदाडे हा बेशुध्द अवस्थेत पडला असल्याची माहिती त्याच्या मित्रांना मिळाली.
घटनास्थळी धाव घेत मित्रांनी नंदू जमदाडे यास ग्रामीण रुग्णालय मानवत येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र सकाळी प्रकृती खालावल्याने त्याला परभणी शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी ११ वाजता डॉक्टरांनी नंदू जमदाडे यास तपासुन (Parbhani Suspicious body) मृत घोषीत केले. जिल्हा सामान्य रुग्णालयात मानवत व परभणी येथील मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समुदाय जमलेला होता. सध्या नंदु सुदाम जमदाडे यांच्यावर परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरु असून पुढील तपास मानवत पोलीस हे करत आहेत.
नातेवाईकांनी केली चौकशीची मागणी
नरळद येथे भेटलेल्या नंदु सुदाम जमदाडे हा बेशुध्दावस्थेत दिसून आल्यानंतर मित्रांनी जमदाडे कुटूंबास कोणतीही पुर्वसूचना दिली नसल्यानेसंशयाचे धागे अधिकच वाढत आहेत. जमदाडे यांचे मोठे बंधु संजय जमदाडे यांनी रात्री उशीर झाल्यानंतर फोन केला. नंदूच्या मित्राकडे विचारपुस केली असता आम्ही पाहुण्याकडे रात्री मुक्काम करणार आहोत. मात्र सकाळी त्याचे निधन झाले. त्यामुळे हा प्रकार घातपाताचा असल्याचा संशय मयताच्या भावाने व्यक्त केला.