घरासमोरुन दुचाकी लांबवली
(parbhani/पूर्णा )-येथिल गवळी गल्ली परीसरातून एक काळ्या रंगाची दुचाकी आज्ञात चोरट्यांनी लांबल्याच्या घटनेप्रकरणी पूर्णा पोलिसा़ंत शुक्रवारी ३ रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्णा शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरटे सक्रिय झाले असून, चोरट्यांनी पोलीसांना (police) आवहान देत रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन एका पाठोपाठ एक दुचाकी चोरुन नेण्याचा हातखंडा सुरू केला आहे.येथिल गवळी गल्लीत राहणारे एक ३५ वर्षीय बालासाहेब भगवान वाघमारे यांची काळ्या रंगाची जुनी वापरती पॅशन प्रो.दुचाकी क्र.एम. एच.२२/ए.ई./५४८६ अज्ञात चोरांनी दि.१ मे रोजी मध्यरात्री चोरुन नेली आहे.दुचाकी मालक वाघमारे यांनी दुचाकी चोरीला गेल्यानंतर सर्वत्र शोध घेतला परिसरातील सि.सी.टी.व्ही (CCTV) मध्ये चोरटे कैद झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.ही घटना ताजी असतानाच सोनार गल्लीतून घरासमोर लावलेली एका भाडेकरु ची दुचाकींही (Bikes) शुक्रवारी चोरीला गेली असल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी पोलीस ठाण्यात (police station) अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास जमादार अण्णा माने हे करत आहेत.