परभणी (Parbhani):- जिल्हा पोलीस भरती सन २०२२ – २३ दरम्यान पोलीस शिपाई (police constable) पदाची लेखी परीक्षा लेखी परीक्षा शुक्रवार १९ जुलै रोजी सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत होणार आहे. जिंतूर रोडवरील ज्ञानोपासक महाविद्यालय येथे परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांनी प्रवेश पत्रातील सूचनांचे पालन करत परीक्षेच्या ठिकाणी १९ जुलै रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत उपस्थित राहवे, असे आवाहन परभणी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या (Offices of the Superintendent of Police)वतीने करण्यात आले आहे.