छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय उपनिबंधक यांचा निर्णय!
ताडकळस (Parbhani) : येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी रुद्रवार हे व्यापारी असल्याने त्यांचे संचालक पद रद्द करुन सभापती पदावरून अपात्र करावे अशी तक्रार त्यांच्याच पॅनलमधील संचालकांनी जिल्हा निबंधकांकडे केली होती. परंतू जिल्हा निबंधकांने ही तक्रार ग्राह्य नसल्याचा निकाल चार महिन्यांपूर्वी दिला होता. या निकालाविरूध्द तक्रारदाराने छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय सहनिबंधकांकडे (Departmental Co-Authorship) अपील केले होते. परंतू या ठिकाणी देखील जिल्हा निबंधकानी दिलेला निर्णय कायम ठेवल्याने सभापती बालाजी रुद्रवार यांचे संचालकपदाबरोबरच सभापती (Speaker) पद देखील कायम राहिले आहे. या निर्णयामुळे सभापती बालाजी रुद्रवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
परभणीतील ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समिती…!
पुर्णा तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या ताडकळस कृषि उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) सभापतीपदी भाजपचे गंगाखेड विधानसभा प्रमुख बालाजी चंद्रकांत रुद्रवार हे मे 2023 मध्ये विराजमान झाले आहेत. परंतु त्यांच्याच सोबत निवडून आलेले सहकारी संचालिका सौ. रेखा अंकूशराव आवरगंड यांच्यासह संचालक सुरेश गिरी यांनी सभापती बालाजी रुद्रवार हे व्यापारी असून त्यांच्या नावाने बाजार समितीच्या आवारातील भूखंड असल्याने त्यांचे संचालक पद रद्द करुन सभापतीपद देखील अपात्र करावे अशी तक्रार जिल्हा निबंधक कार्यालय परभणी यांच्याकडे केली होती. परंतू जिल्हा निबंधकांनी सभापती बालाजी रुद्रवार हे शेतकरी (Farmer) असुन त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती असल्याचे सिद्ध झाले होते. तसेच त्यांच्या नावावर असलेले भुखंड हे संचालक होण्यापूर्वीच तत्कालीन संचालक मंडळाने वाटप केले असल्याने त्यांचे संचालक पद कायम ठेवण्याचा निर्णय 23 आँक्टोबर 2024 रोजी दिला होता. या जिल्हा निबंधकांच्या निर्णयाविरुद्ध संचालिका सौ. रेखा आवरगंड यांनी छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय सहनिबंधक (Divisional Joint Registrar) यांच्याकडे अपील करुन दाद मागितली होती. तसेच या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय द्यावा यासाठी उच्च न्यायालयात धाव देखील घेतली होती.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा निर्णय लवकरात लवकर देण्यात आला आहे.छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय सहनिबंधकांनी देखील 23 जानेवारी रोजी जिल्हा निबंधकांचाच निर्णय कायम ठेवला असुन सभापती बालाजी रुद्रवार यांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने त्यांना संचालक म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय दिल्याने सभापती पदी बालाजी रुद्रवार हेच कायम राहणार असून त्यांची बाजू अॅड. निळकंठ पावडे यांनी मांडली.
सत्याचाच विजय- सभापती बालाजी रुद्रवार
ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती म्हणून काम करीत असताना प्रामुख्याने शेतकरी, व्यापारी व हमाल-मापाडी घटकांना न्याय (Justice) मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असुन जिल्हा निबंधक व विभागीय सहनिबंधकांनी दिलेल्या निर्णयामुळे सत्याचाच विजय झाला असल्याची प्रतिक्रिया सभापती बालाजी रुद्रवार यांनी देशोन्नतीला दिली.
विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल- संचालिका सौ.रेखा आवरगंड
ताडकळस बाजार समितीच्या आवारात विद्यमान सभापती बालाजी रुद्रवार यांच्या नावाने भुखंड असुन ते भाडेतत्त्वावर दिले आहेत. या बाबतची सर्व कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करुनही निर्णय योग्य मिळाला नसल्याने या निर्णयाला छत्रपती संभाजी नगर येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, योग्य निर्णय न्यायालयात (Court) मिळेल अशी प्रतिक्रिया निकालानंतर संचालिका सौ. रेखा अंकुशराव आवरगंड यांनी देशोन्नतीशी दिली.