शौर्यपूर्ण कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक देखील मिळाले
त्यांनी विशेष अभियान पथकामध्ये २६ वर्षांहून अधिक काळ कर्तव्य बजावले आहे. पोलीस शिपाई ते पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदापर्यंतच्या त्यांच्या प्रवासात ०३ वेगवर्धीत पदोन्नती मिळाल्या आहेत,त्यांच्या अभियानातील कौशल्य आणि निर्भय दृष्टिकोनामुळे त्यांना सी-६० पथकामध्ये एक महत्वपूर्ण पार्टीं कमांडर बनवले आहे, ज्याचे नेतृत्व ते ४८ व्या वर्षीही करत आहेत. सर्वात धोकादायक परिस्थितीतही नेतृत्व करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे त्यांना त्यांच्या सहकारी अधिकारी व अंमलदार तसेच वरिष्ठांकडून देखील आदर आणि प्रशंसा मिळाली आहे. त्यांच्या शौर्यपूर्ण कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक देखील मिळाले आहे. याव्यतिरिक्त, त्यांचे आणखी दोन पोलीस शौर्य पदकासाठीचे प्रस्ताव सध्या विचाराधीन आहेत. यासोबतच त्यांना महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांचेकडून मिळणारे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देखील प्राप्त झाले आहे. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी त्यांचा विशेष सत्कार केला.