सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
परभणी (illegal sand Case) : पाथरी तालुक्यातील गुंज येथील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर रविवार ११ मे रोजी सायंकाळी पाथरी पोलिसांनी कारवाई करत सुमारे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोमवारी सायंकाळी ७ वा सुमारास केलेल्या कारवाई दरम्यान ट्रॅक्टर ट्रॉलीसह एक ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून, (illegal sand Case) ट्रॅक्टरची किंमत अंदाजे ६ लाख रुपये आणि वाळूची किंमत ५ हजार रुपये इतकी असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ६ लाख ५ हजार रुपये इतकी आहे.
या प्रकरणात आरोपी सचिन हनुमान ढोले (वय २४, रा. गुंज, ता. पाथरी) याच्याविरुद्ध संबंधित कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अशोक धस व पोलीस नाईक सुरेश कदम यांनी केली. (illegal sand Case) अवैध वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांनी सुरु केलेली ही धडक कारवाई परिसरात चर्चेचा विषय ठरत असुन महसुल व पोलीसांकडून होणाऱ्या सततच्या कारवाईमुळे वाळू माफियांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.