पातूर (Patur Naib Tehsildar) : अकोला जिल्ह्यातील पातूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार बळीराम चव्हाण यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली आहे. शासकीय काम करण्याच्या बदल्यात ४ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, (Patur Naib Tehsildar) नायब तहसीलदार बळीराम चव्हाण यांनी एका तक्रारदाराकडे शासकीय काम पूर्ण करण्यासाठी ४ हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्यामुळे त्यांनी अकोला येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
एसीबीच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली. पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये, आरोपी लोकसेवक बळीराम चव्हाण यांनी तक्रारदाराकडे ४ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. यानंतर, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तात्काळ कारवाई करत नायब तहसीलदार बळीराम चव्हाण यांना अटक केली. त्यांच्याविरोधात (Patur Naib Tehsildar) लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियम कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुढील तपास अकोला एसीबी करत आहे.