२८ करोड ९२ लाख पाण्यात जाणार?
पवनी (Pauni Pipe line) : पवनी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन वैनगंगा नदीवरील गोसे प्रकल्पातून नव्याने तयार केलेल्या फिल्टर प्लांटला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन गोसे प्रकल्पापासून ते पवनी येथील फिल्टर प्लांटपर्यंत टाकण्यात आली. परंतु सदर (Pauni Pipe line) पाईप लाईन टाकताना लहान मोठ्या नाल्यातून जाणार्या पाईप लाईनला निकृष्ट दर्जाचे पिलर दिल्यामुळे पवनी-कोरंभी रोडवरील मनोसूमन पब्लिक स्कूलच्या जवळ असलेल्या नाल्यातील पिलर कोसळले व फिल्टर प्लांटला होणारा पाणीपुरवठा बंद झाला. धरणाजवळील मोटारपंप सुरू केल्यानंतरही फिल्टर प्लांटमध्ये पाणी न आल्यामुळे पाहणी केली असता नमूद ठिकाणी पाईप लाईन कोसळली.
सकाळी ५.३० वाजता शहरातील काही भागात होणारा (Pauni Pipe line) पाणीपुरवठा न झाल्यामुळे शहरातील सतर्क नागरिक यादोराव भोगे यांनी न.प.कर्मचारी शैलेश बिसने, नळ कारागिर अमित रामटेके यांनी भर पावसात पाहणी केली तेव्हा ही बाब लक्षात आली. सदर लाईन कोसळल्यामुळे सध्याच्या पावसाळी परिस्थितीत पवनी शहराला १०-१५ दिवस पाणीपुरवठा होणार नाही.
ही बाब लक्षात घेऊन जुन्या फिल्टर प्लांटची पाहणी केली व तो सुरू करून शहराला (Pauni Pipe line) पाणीपुरवठा केला. त्यामुळे तिघांचेही आभार मानले, ते थोडेच. सदर पाणीपुरवठा करणारी लाईन अल्पशा पावसाने कोसळल्यामुळे २८ कोटी ९२ लाख रुपये खर्च करून नवीन फिल्टर प्लांटच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पुढे पुन्हा ती पाईपलाईन टिकते यावर शंका व्यक्त केल्या जात असून लागलेला पैसा व्यर्थ जाणार तर नाही अशी शंका व्यक्त होत आहे.
समस्यांची जाण असणारे संघर्ष समिती संघटन
फिल्टर प्लांटला पाणीपुरवठा करणारी लाईनची चाचणी सुरू असून त्यातूनच शहराला (Pauni Pipe line) पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत आहे. अजूनही सदर प्लांट नगरपरिषदेला हस्तांतरीत झाला नसतानाही नगर प्रशासनाने जुना फिल्टर प्लांट बंद केला. परंतु पुढे नवीन प्लांटमध्ये काही बिघाड झाल्यास शहराला कित्येक दिवस पाणीपुरवठा होणार नाही, यास्तव जुने फिल्टर प्लांट सुध्दा कार्यान्वयीत ठेवण्यासाठी पवनी नागरिक संघर्ष समितीचे यादोराव भोगे यांनी नगरप्रशासनाची भेट घेऊन प्रसंगी दबाव तंत्राचा वापर करून जुने फिल्टर प्लांट कार्यान्वीत ठेवण्यास भाग पाडले. त्यामुळे नवीन पाईप लाईन फुटली. जुनीच तहान भागवित आहे. अन्यथा पवनी शहरात भर पावसाळ्यात (Pauni Pipe line) पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झाला नसता.