टिप्परसह दीड कोटींचा मुद्देमाल जप्त
पवनी (Pauni police Raids) : पवनी वैनगंगा पात्रातील रेतीला फार दूरवर मागणी असल्यामुळे भर पावसाळ्यातही नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाली की, रेतीचोरटे आपला मोर्चा गुडेगाव रेतीघाटाकडे वळवितात. २ ऑगस्टच्या रात्री गुडेगाव रेतीघाटावरून वैनगंगेच्या पात्रातून रेती काढण्याच्या उद्देशाने टिप्पर व रेती लोडर घाटावर आल्याची गुप्त बातमी पवनी पोलीस ङ्खाण्यात कळताच भंडारा पोलीस अधीक्षक नूरुल हसन व अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार (Pauni police Raids) पवनी पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांनी पीएसआय प्रितम येवले यांचे नेतृत्वात सापळा रचून गुडेगाव येथील वैनगंगा नदीपात्राजवळ २ ऑगस्टच्या रात्री १ वाजता दरम्यान रेड करून ४ टिप्पर व १ ट्रॅक्टर लोडर जप्त केला. त्यामुळे रेतीतस्करांचे धाबे दणाणले.
पोलिसांनी कारवाई करताच त्यापैकी एक लोडरचालक लोडर घेऊन पळाला. पोलीस नायक किरण नागदेवे यांचे तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. सदर रेड मारणार्या पथकात गणेश बिसने, पो.ना.ढाकणे, चालक कुर्झेकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
३१ जुलैला तहसिलदार महेंद्र सोनोने सेवानिवृत्त झाले. १ ऑगस्ट महसूल कर्मचारी व पावसानेही साथ दिली. नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाली. जंगल परिसरात असलेला सुनसान घाट, ज्यातून वर्षभरही रेती तस्करी होते. ४ टिप्पर गुडेगाव घाटावर धडकले. गुप्त माहितीच्या आधारे पवनी पोलिसांनी धाड टाकली. ३ टिप्पर, अज्ञात आरोपी, तर एक हजर मिळाला. एक रेती लोडर पळाला.
यात मिळालेला मुद्देमाल टिप्पर क्र. एम.एच.४९/बी.झेड.९८९७ कि.४०,००,०००/-रु चा अज्ञात चालक व मालक, टिप्पर क्र. ए.एच.४०/बी.एल.४७१८ कि. ४०,००,०००/-रु चा अज्ञात चालक व मालक, टिप्पर क्र. एम.एच.४०/बी.जी.९५७७ कि. ३०,००,०००/-रु चा अज्ञात चालक व मालक, टिप्पर क्र. एम.एच.३५/ए.जे.३१०६ कि.४०,००,०००/-रु चा चालक हिमांशु योगश ङ्खाकरे (२१) रा. न्यू भगवती नगर खरबी रोड, नागपूर व मालक सचिन वाघमारे रा. हुडकेश्वर नागपुर, ट्रॅक्टर लोडर विना क्रमांकाचा कि. १०,००,०००/-रु चालक/मालक स्वप्नील एकनाथ रेवतकर (२६) रा. मालची (कोंढा) त.पवनी जि.भंडारा यांनी रेती चोरी करण्याचे उद्देशाने (Pauni police Raids) अवैधरित्या विना पास परवाना आपल्या ताब्यातील वाहने गुडेगाव येथील वैनगंगा नदीपात्राजवळ मिळून आल्याने त्यांचेविरुदध वâलम ३०३ (२), ४९ भा. न्या. स अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.