अमरावती (Ushatai Utane Memorial Award) : डॉ. उताणे फाउंडेशन द्वारा उषाताई उताणे स्मृती पुरस्कार (Ushatai Utane Memorial Award) दि. 1 ऑगस्ट 2025 ला माजी जि . प . अध्यक्षा उषाताई उताणे यांच्या स्मृती दिनी गुणवंत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देण्यात येतो . सायत येथील जिल्हा परिषद प्रा. शाळेतील 4 थ्या वर्गातील विद्यार्थिनी कु. प्राजक्ता वर्धे (Prajakta Wardhe) हिने सर्वात जास्त गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक मिळविला. तीची निवड या पुरस्कारा साठी करण्यात आली.
3000रु रोख व स्मृती पुरस्कार (Ushatai Utane Memorial Award) देऊन गौरविण्यात आले. तसेच द्वितीय पुरस्कार तन्मय तायडे याला रोख 2000 व स्मृती चिन्ह व तृतीय पुरस्कार ईशानी तायडे हिला रोख 2000 व स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले . संत गाडगे बाबा विद्यालय ,सायत येथील वर्ग 10 वी च्या बोर्ड परीक्षेमध्ये सायत येथून प्रथम आलेली पायल राऊत हीची पुरस्कार साठी निवड करून स्मृती चिन्ह व 4000 रु रोख देऊन गौरविण्यात आले तर शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केल्या बद्दल कु श्रावणी पानेरे हिला रोख 3000 व स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला . सदर कार्यक्रम हे क्रमशः जि.प.शाळा व संत गाडगे बाबा विद्यालय येथे घेण्यात आले.
दोन्ही पुरस्कार डॉ. उताणे फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ. राजेश उताणे यांच्या हस्ते देण्यात आले.ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिक सक्षम होण्यासाठी डॉ.उताणे फाऊंडेश तर्फे दरवर्षी याचे आयोजन केल्या जाते. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक रामावत, बेलसरे , सोसे ,सोनटक्के, चव्हाण, समीक्षा ,सायत येथील पोलीस पाटील अशोक राऊत, शाळा समिती अध्यक्ष मंगेश मोहोड जि प शाळेचे मुख्यध्यापक अमोल आखाडे , प्रशांत भाकरे, बाळासाहेब उताणे, यादवराव उताणे, जगदीश काळे, राजेश उताणे, गजानन उताणे, स्पर्श उताणे, ऋषिकेश चौधरी, शंकर तायडे ,साहेबराव राऊत यांच्या प्रमुख उपस्थित हे (Ushatai Utane Memorial Award) पुरस्कार देण्यात आले. या वेळी विद्यार्थी,पालक व गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते .