प्रासंगिक
दत्तात्रय भटकर
बार्शीटाकळी (Prakash Pohare) : देशाचा अन्नदाता नैसर्गिक व मानवनिर्मित संकटामुळे आत्महत्या करत असल्याने लाखो शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. या दुःखाचे जाणीव लक्षात घेऊन, दैनिक देशोन्नतीचे मालक, संपादक व लोकनायक, शेतकरी नेते , तथा किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रकाश भाऊ पोहरे (Prakash Pohare) शेतकऱ्यांच्या हितासाठी, सर्व सुख सुविधा उपलब्ध असल्यावरही, सर्व ताकद खर्च करून शेतकऱ्यांच्या हितासाठी रत्यावर उतरणारे तारणहार ठरले आहेत.
राज्यातील शेतकरी खरिपाची शेती मोठ्या प्रमाणात करतात.पूर्वीच्या काळात शेतकरी शेतात पीक घेण्याकरिता, घरचेच बी बियाणे, शेणखते, सेंद्रिय खते, हिरवळीचे खते व गांडूळ खते यांचा वापर करत बैलावरची शेती करायचा. मात्र सद्यस्थितीला शेतकरी संकरित बी बियाणे, रासायनिक खते तणनाशके विविध प्रकारच्या कृषी निविष्ठा व ट्रॅक्टरच्य विविध यंत्राद्वारे शेती करत असल्याने इंधन खर्च मोठ्या प्रमाणात होत असून शासकीय व अनुदानाच्या फुकट्या योजनामुळे शेतकऱ्यांच्या शेतीत काम करायला मजूर मिळत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
पूर्वीच्या काळी शेतातून तयार होणाऱ्या पिकाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना नफा मिळत असल्याने शेतकरी आत्महत्या होत नसत. परंतु गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना उत्पादित झालेल्या पिकापेक्षा कमी भाव मिळत असल्याने व नैसर्गिक संकटामुळे उत्पादनात घट होत असल्याने तसेच शासनाने जाहीर केलेल्या हमीभावानुसार बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या पिकाची विक्री होत नसल्याने शेतकऱ्यांनी पीक लागवडीकरिता काढलेल्या कर्जाची परतफेड होत नाही. अशा विदारक परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करून लाखो कुटुंबे उद्ध्वस्त होत होती.
देशात व राज्यात शेकडो धन दांडग्या व्यक्तींची वृत्तपत्रात शेतकरी आत्महत्येची एक बातमी सुद्धा प्रकाशित होत नसलेल्या अतिशय खडतर काळात ,शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव लक्षात घेऊन मा. प्रकाशभाऊ पोहरे यांनी दैनिक देशोन्नती या वृत्तपत्रातून शेतकरी आत्महत्येची विदारक परिस्थिती देशाचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी पंतप्रधानांनी 72 हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. विशेष म्हणजे यावेळी शासनाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना एक लाख रुपये मदतीचा क्रांतिकारी निर्णय घेतला होता. त्यामुळे देशातील व राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला.
प्रकाशभाऊ पोहरे (Prakash Pohare) यांचेकडे आनंदात जीवन जगण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध असल्यावरही आनंदात जीवन जगता आले असते. परंतु या ध्येवेद्या अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेल्या मा. प्रकाशभाऊ पोहरे (Prakash Pohare) हे शेतकऱ्यांचे तारणहार ठरले आहेत. शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबरला शेतकरी लूट वापसी सभेचे आयोजन आपल्या जन्मभूमीत व्हावे. या उदात्तेतूने त्यांनी आयोजित केलेल्या शेतकरी संवाद सभेला शेतकऱ्याकडून कोटी कोटी मंगलमय शुभेच्छा, व त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
-दत्तात्रय भटकर
मोबाईल 73 50 25 06 17