बार्शी टाकळी (Shekhar Katekar) : स्वतःचा जीव धोक्यात घालून व कुटुंबाकडे दुर्लक्ष करून सैनिक देशाच्या सीमेवर रात्रंदिवस सेवा देत असल्याने ,आपण सर्वजण सुरक्षित आहोत. सैनिक देशाचे आधारस्तंभ आहेत. असे मत उद्योजक (Shekhar Katekar) शेखर काटेकर यांनी व्यक्त केले.
बार्शीटाकळी तालुक्यातील गोरव्हा गावातील आदित्य वाहुरवाघ व बार्शिटाकळी च्या ढोरे वेताळाती प्रज्वल पळसकार यांची काही दिवसापूर्वी भारतीय सैन्य दलातील आर्मी शाखेत भरती झाले होते. सात महिन्यांचेप्रशिक्षण पूर्ण करून गावी परत आले.परत आल्यानेसुटी वर गावी परत आले असता, गावात ठिक ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले.
सदर सैनिकांचा सन्मान सोहळा मंगळवार दिनांक 24 जूनला बार्शीटाकळी येथील सर्वज्ञ शो रूम मध्ये आयोजित केला होता. यावेळी देशभक्तीपर गीते व मंगलमय वातावरणात सदर सैनिकांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शेखर काटेकर, अनंत केदारे, दत्तात्रय साबळे, सौरभ अग्रवाल, संजय वाट, आकाश धात्रक, शालिनी वाहूरवाघ, रवी हिवराळे, सागर खंडारे, मोहसीन खान असे अनेक जण उपस्थित होते.