कन्हान (Pola festival) : पिपरी येये पारंपारिक पध्दतीने तोरणाच बैल जोडी रांगेत उभ्या करून ” पंच मुखी गौरा पारबती, हर बोला हर हर महादेव ” च्या जय घोषात वाज्या गाज्यासह तिवाडे परिवारांच्या घरून शुभाष तिवाडे यांनी गुढी पकडुन राधेश्याम भोयर यानी काढुन तोरणात येऊन सर्व बैलजोडी ची पुजा अर्चना करून झडती म्हणत एका बाजुने दुस-या बाजु पर्यंत सर्व बैलजोडी वरून गुढी फिरवुन तोरण तोडुन पोळा फोडण्यात आला.
सर्व बैलजोडया (Pola festival) हनुमानाच्या मंदीरा त पोहचुन पुजा करून आपआप ल्या घरी जावुन पुजा केल्यावर गावातील घरोघरी बैल जोडया फिरू लाग ल्या. याप्रसंगी देवा चतुर, निलकंठ कुरडकर, लिलाधर वाघाडे, केसरीचंद खंगारे, डॉ. मनोहर पाठक, अशोक मेश्राम, प्रशांत मसार, राजेंद्र शेंदरे, मनोज बावने, महेंद्र साबरे, संजय हावरे, फजित खंगारे, आकाश महातो, मोरेश्वर भोयर, दिपक ताजणे, सोनु मानकर, रमेश खंगारे, पुरूषोत्तम लांजेवार, आकाश वाढणकर, श्रावण खंडाते, अकुंश भोयर, दिलीप येलमुले, हरिदास ठाकरे सह मोठया संख्येने पिपरी, कन्हान येथील नागरिक उपस्थित होते.