कन्हान (Pimpal Save World Organization) : पर्यावरणाच्या ढासळता समतोल आणि भविष्यातील पर्यावरणातील भयाण संकट लक्षात घेता, कन्हानमध्ये राजकुमार चाहंदे यांचा संकल्पनेतून पिंपळ सेव्ह वर्ल्ड ऑरगॅनिजेशन (Pimpal Save World Organization) ही पर्यावरणाबाबत विशेष जागरूक असलेली संस्था गेल्या अनेक वर्षांपासून कन्हान परिसरात दरवर्षी अनेक वृक्ष जागोजागी लावण्याचे कार्य करत आहे. त्याचप्रमाणे याही वर्षी ६ जुलै रोजी पर्यावरणाच्या विशेष संकल्प घेत परिसरात शेकडो वृक्ष लावण्यात आली.

पिंपळ सेव्ह वर्ल्ड ऑरगॅनिजेशने (Pimpal Save World Organization) यावर्षी अनेकांची मदत घेत एक मोठा सामाजिक संदेश सगळ्यांपुढे ठेवला. कन्हान परिसरातील सर्वपक्षीय नेते अनेक सामाजिक कार्यकर्ते आज मोठ्या प्रमाणत वृक्षरोपणाचा या चळवळीत सहभागी झाले आणि मोठा उत्साहात व तळमळीने सकाळपासूनच संपूर्ण कन्हान परिसरात शेकडो सप्तपरणी, वड, पिंपळ, कडुलिंब, कदम, करंज, बदाम, जामून, आंबा, मोहगणी सहित अनेक झाडे यशस्वी रित्या लावण्याचे उत्तम कार्य केले. या (Pimpal Save World Organization) उपक्रमास परिसरातील नागरिकांनी कौतुकाचा वर्षाव केला आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा ही दिल्या.





 
			 
		
