शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा!
कोरची (PM Pikvima Yojana) : कोरची येथील तहसील कार्यालयात (Tehsil Office) खरीप हंगाम 2025 मधील राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा भीतीपत्रकाचे अनावरण झाल्यापासून 1 ते 31 जुलै 2025 पर्यंत पिक विमा काढण्यासाठी सुरुवात झालेली आहे. त्यासाठी पिक विमा हे कृषी ऑफीस, स्थानिक बँका, सीएससी केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, शेतकरी (Farmer) यांना भेटी देऊन जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनातर्फे पीकविमा योजनेमध्ये चांगले बदल करण्यात आले!
कोरची तालुक्यात विविध ठिकाणी पिक विमा योजने बाबतची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी तालुका कृषी अधिकारी पी.जी अंबोरकर सर, मंडळ कृषी अधिकारी डी. जे मेश्राम सर, उप कृषी अधिकारी आय. जे पाढोडे सर, सहायक कृषी अधिकारी एच. एम जमकातान सर, पि. एम किसान संगणक चालक अविनाश हुमणे सर, पिक विमा प्रतिनिधी अमोल टेंभुर्णे आदी उपस्थित होते. यावर्षी महाराष्ट्र शासनातर्फे (Government of Maharashtra) पीकविमा योजनेमध्ये अत्यंत चांगले बदल करण्यात आले असून ते शेतकऱ्यांचा हिताचे आहेत. शेतकऱ्यांनी काही शंका असल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कोरची येथे भेट द्यावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
पीकविमा घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना समप्रमाणात नुकसानभरपाई मिळणार!
दरम्यान, पिक पेरणी पासुन काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक घटक, कीड व रोगांचा प्रार्दुभाव इत्यादी कारणांमुळे पीक कापणी प्रयोगाद्वारे येणारे उत्पादन हे त्या महसूल मंडळासाठीच्या उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यास त्या महसूल मंडळातील (Board of Revenue) त्या पीकविमा घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना समप्रमाणात नुकसानभरपाई मिळणार आहे.




