Pandharkawda crime :- संध्याकाळी दुकान बंद करण्याच्या वेळेस सोन्या-चांदीचे दागिने (Gold and silver ornaments) खरेदी करण्याकरीता आलेल्या दोन महिलांनी महिला दुकानदाराची नजर चुकवुन १५ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या चोरुन नेल्याची घटना २१ ऑक्टोंबर २०२४ रोजी मेन रोडवरील कटकोजवार ज्वेलर्समध्ये घडली होती. सिसिटिव्ही फुटेजच्या(CCTV Footage) आधारे त्या दोन्ही चोरट्या महिलांचा शोध पांढरकवडा पोलिसांनी घेतला असुन त्यांना नागपूर येथुन अटक करुन आणुन त्यांच्या जवळुन चोरीचा मुद्देमाल सुध्दा जप्त केला आहे.
कटकोजवार ज्वेलर्स मधुन चोरल्या होत्या अंगठ्या
सौ. चंदा धनराज मढके (५४) रा. गारगुटीनगर हुडकेश्वर नागपूर, श्रीमती अनिता राजन मोरे (५६) रा. कौशल्यानगर नागपुर असे अटक करण्यात आलेल्या चोरट्या महिलांची नावे आहे. श्रीमती मनिषा वामनराव कटकोजवार (३९) रा. गांधी वार्ड ह्या घटनेच्या दिवशी त्यांचे ज्वेलर्स बंद करीत असतांना वरील दोन्ही महिला त्यांच्या ज्वेलर्स मध्ये आल्या. त्यांनी सोन्या – चांदीचे दागिने पाहण्याच्या बहाण्याने १५ ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या चोरल्या. त्या दोन्ही महिलांनी ३.६८९ ग्रॅमचे चांदीचे जोडवे कमलेश चौधरी यांच्या नावाने ज्वेलर्स मधुन खरेदी केले होते. त्या महिला गेल्यानंतर कटकोजवार यांना सोन्याच्या अंगठ्या कमी दिसल्या. त्यांनी दुकानातील सिसिटिव्ही फुटेज तपासले असता, त्या दोन्ही महिला सोन्याच्या अंगठ्या चोरत असतांना त्या दिसुन आले. त्यांनी याची तक्रार पांढरकवडा पोलीसात केली होती.
सदर घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता, आयपीएस रॉबिन बन्सल, पोलीस निरिक्षक दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पिएसआय नितिन सुशिर, पो कर्मचारी प्रमोद जुनुनकर, विलास जाधव, सचिन काकडे, राजु बेलयवार, राजु मुत्यलवार यांनी केला आहे.