परभणी (Police Dial 112) : गंगाखेड पोलीसांच्या डायल ११२ क्रमांकावर (Police Dial 112) आलेल्या एका कॉलमुळे रात्रीच्या वेळी गंगाखेड तालुक्यातील खळी पाटी गोदावरी नदी पूल परिसरात एकटी फिरत असलेली २१ वर्षीय तरुणी गुरुवार २६ जून रोजीच्या पहाटे कामठी नागपूर येथे पालकांकडे सुखरूप पोहचली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी परभणीतील गंगाखेड तालुक्यातील खळी पाटी गोदावरी नदी पुल परिसरात मंगळवार २४ जून रोजी रात्री उशिराने ११ वाजेच्या सुमारास एक तरुणी एकटी फ़िरत असल्याची माहिती या रस्त्याने ये जा करणाऱ्यांपैकी एका व्यक्तीने (Police Dial 112) पोलीसांच्या डायल ११२ क्रमांकावर कॉल करून दिली असता गंगाखेड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचवेळी खळी पाटी गोदावरी नदी पुल परिसरात धाव घेत एकट्याने फिरत असलेल्या २१ वर्षीय तरुणीला पोलीस ठाण्यात आणले.
तेंव्हा प्रभारी अधिकारी सपोनि आदित्य लोणीकर, मपोशि भाग्यश्री मुंढे यांच्या समक्ष तिचा जबाब नोंदवून घेऊन तिचे नाव व पत्ता जाणून घेत याची माहिती पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांना देण्यात आली व नागपूर येथील कामठी परिसरातील तरुणीच्या पालकांशी संपर्क साधत पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या व प्रभारी अधिकारी सपोनि आदित्य लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार मुंजा वाघमारे यांनी बुधवार २५ जून रोजी दुपारी ४ वाजता गंगाखेड पोलीस ठाण्यातील पो.शि. प्रकाश गिराम, परभणी मुख्यालयातील मपोशि. शिवकन्या जाधव, मपोशि. प्रियंका पावडे आदीं २१ वर्षीय तरुणीला सोबत घेऊन गंगाखेड येथून नागपूरकडे निघाले. गुरुवार २६ जून रोजी पहाटे अंदाजे २:३५ वाजेच्या सुमारास त्यांनी या तरुणीला सुखरूप तिच्या पालकांच्या ताब्यात दिले. (Police Dial 112) डायल ११२ वरील एका कॉलमुळे २१ वर्षीय तरुणी सुखरूप पालकांकडे पोहचल्याने पालकांसह पोलीसांनी ही सुटकेचा श्वास सोडला.




 
			 
		

