मानोरा (Police Patil Sonone) : तालुक्यातील मौजे कारखेडा गावाचे पोलीस पाटील वासुदेव चंद्रभान सोनोने (Police Patil Sonone) यांना १२ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे मृदू व जलसंधारण तथा पालक मंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते २०२३ – २४ चा पोलीस पाटील विशेष उल्लेखनीय सेवा राज्यपाल पुरस्काराने सन्मानित करुन २५ हजार रुपये रोखसह सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सन्मानीत करण्यात आले.
यावेळी खा. संजय देशमुख, आ. अमित झनक, आमदार भावनाताई गवळी, आ. लखन मलिक , जि प अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. मॅडम, पोलीस अधीक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या उपस्थितीत (Police Patil Sonone) पोलीस पाटील पदाला सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार उत्कृष्ट कार्य पोलीस पाटील राज्यपाल पुरस्कार पालक मंत्री ना. राठोड यांच्या हस्ते पोलीस पाटील सोनोने यांना प्रदान करण्यात आला.




