हिंगोली (Police Team) : जिल्ह्यात थर्टीफस्टच्या पृष्ठभूमिवर सर्वच पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली असून अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोणातून तळीरामांवर कारवाईचा बडगा उपसला. थर्टीफस्ट सर्वत्र उत्साहात व शांततेत पार पडावे या उद्देशाने जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यात ३२ ठिकाणी नाकाबंदी करून वाहन तपासणीच्या सूचना दिल्या होत्या.
त्या निमित्ताने २९ डिसेंबर पासूनच जिल्ह्यातील तेराही (Police Team) पोलीस ठाणे हद्दीमध्ये रस्त्यावर पोलिसांनी बॅरीकेटींग लावून वाहन तपासणी केली. तसेच चालकांची ब्रेथ अॅनालायझर मशिनद्वारे तपासणी केली. ज्यामध्ये अनेक मद्यपी वाहन चालक आढळून आले. त्याचप्रमाणे प्रमुख रस्त्यावरील ढाबे, हॉटेल्स आदींवर अवैध दारू विक्री होऊ नये यासाठी सुद्धा परिणामकारक कारवाई करण्यात आली. यासोबतच कुठेही घातपातीच्या घटना घडू नये या दृष्टीकोणातून जिल्ह्यातील शेकडो लॉजेस तपासणी करण्यात आल्या. यासोबतच रेल्वे स्टेशन, बसस्थानक आदींसह प्रमुख ठिकाणी संशयीतरित्या वावरणार्या व्यक्तींची देखील चौकशी करण्यात आली.
पोलिसांनी (Police Team) नाकाबंदी दरम्यान अनेक मद्यपी चालक आढळले. कुरूंदा बसस्थानकाच्या सार्वजनिक रस्त्यावर नितीन गुणाजी जाधव रा.जवळा पांचाळ, कनेरगाव नाका येथे गंगाधर रामन वाबळे रा.बोराळवाडी, नर्सी फाटा टी-पॉईंटवर सुरेश उत्तम ढुमणे हा मोटार सायकल क्रमांक एम.एच.३८-ए.एच.४३१६ ही मद्य सेवन करून नागमोडी चालवित होता. खटकाळी फाट्याजवळ लक्ष्मण विठ्ठल मालेकर रा. राहोली बु. यांनीही मद्य सेवन करून मोटार सायकल क्रमांक एम.एच.३८-ए.बी.७९९७, खटकाळी फाट्याजवळ खॉजा खान रहेमान खान रा. मस्तानशहानगर हिंगोली याने मद्य सेवन करून मोटार सायकल क्रमांक एम.एच. ३८-एच.६८०५, मारोती सदाशिव जर्हाड रा. चिखलवाडी हिंगोली याने मद्य सेवन करून मोटार सायकल क्रमांक एम.एच. ३८-०४१४, ऋषिकेश दादाराव ढाकरे रा. सुराणानगर हिंगोली याने मद्य सेवन करून मोटार सायकल क्रमांक एम.एच. ३८-ए.ए.०१४९ ही चालविली. याप्रकरणी बाळासाहेब खोडवे, सुधीर ढेंबरे, विकास आडे, उमेश कारामुंगे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मद्यपी चालकावर कारवाई करण्यात आली.




 
		

