संपूर्ण गाव अंधारात असून ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम!
परभणी (Power Outage) : परभणीच्या पाथरी तालुक्यातील पाटोदा (गं.कि.) जुन्या गावाचा वीजपुरवठा (Power Supply) गेल्या 10 दिवसांपासून पूर्णपणे खंडित असून, ग्रामस्थांनी महावितरणकडे (Mahavitaran) वारंवार तक्रार करूनही अद्याप वीजपुरवठा सुरळीत करण्यात आलेला नाही. पुढील दोन दिवसांत विद्युत पुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलनाचा (Agitation) इशारा आता ग्रामस्थांनी प्रशासनास (Administration) दिला आहे. पाटोदा गाव शिवारात 14 मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे 11 केव्हीचे तीन विद्युत खांब कोसळले असून, संबंधित वीजवाहिन्याही (Power Lines) तुटल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण गाव अंधारात असून ग्रामस्थांच्या (Villagers) दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.
तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी!
या संदर्भात गावातील नागरिकांनी शनिवार 24 मे रोजी महावितरणच्या परभणीतील पाथरी येथील उपअभियंता कार्यालयात (Deputy Engineer’s Office) निवेदन सादर करून तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी केली आहे. पुढील दोन दिवसांत दुरुस्ती न झाल्यास सोमवार 26 मे रोजी सर्व ग्रामस्थांच्या वतीने कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.